ब्रेकिंगबांगलादेशी घुसखोर रोहिंग्यानां कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करा - आ.संग्राम...

बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यानां कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करा – आ.संग्राम जगताप

spot_img

बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यानां कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करा – आ.संग्राम जगताप

अहिल्या नगर – फेब्रुवारी १०, २०२५ – देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असून महाराष्ट्र व त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात घुसघोर अधिक वाढल्याचे दिसून आहेत. नुकतेच पुण्यातील स्वारगेट परिसरात एका बांग्लादेशी घुसखोराकडे आधार कार्ड, पॅन कार्डसह मतदान कार्ड व ड्रायव्हिंग लायसेन्स देखील सापडले आहे. तर मालेगावमध्ये एका घुसखोरास नकली जन्म दाखला दिल्याप्रकरणी तहसीलदार निलंबनाची कार्यवाही समोर आली आहे.

तसेच अहिल्यानगर शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी जिहादी वृत्तीच्या सेतु चालकांमार्फत नकली शिक्के व बोगस आधारकार्ड बनवुन देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर शहरात अधिकचे सेतू केंद्रे हे जिहादी वृत्तीच्या सेतू चालकांकडे आहेत जे नगर शहरासह आजू बाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिंग्यानां कागदोपत्री आश्रय देत आहेत. हे सेतू चालके या रोहिंग्यानां आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लायसेन्स सह रेशन कार्ड देखील काढून देत आहेत ज्यात तहसील कार्यलयातील कर्मचारी वर्ग चिरीमिरी साठी या सर्व कागदपत्राना मंजुरी देत आहेत.

हा सर्व प्रकार गंभीर असून आपण स्वतः यात जातीने लक्ष घालून बांगलादेशी रोहिंग्यानां कागदोपत्री आश्रय देणारे जे कोणी जिहादी वृतीचे सेतू चालक असतील अश्या सर्वांची कारवाई करून सेतू केंद्रे रद्द करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे आ. संग्राम जगताप यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्हापरिषदेचा अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला..!

यशस्वी सापळा कारवाई ▶️ युनिट - अहिल्यानगर. ▶️ तक्रारदार- पुरुष,वय-60 वर्षे ▶️ आरोपी - अशोक मनोहर शिंदे,...

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय…! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का ‘ॲक्शन’?

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय...! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का 'ॲक्शन'? महासत्ता भारत / अहिल्यानगर गोरगरिबांच्या...

स्वच्छतेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल: आमदार संग्राम जगताप प्रत्येक नगरकराने शहर स्वच्छतेची जबाबदारी घ्यायला हवी: आयुक्त यशवंत डांगे

स्वच्छतेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल: आमदार संग्राम जगताप प्रत्येक नगरकराने शहर स्वच्छतेची...