राजकारणबहुजन समाजातील युवकांसाठी राज्यभर प्रशिक्षण आणि बेरोजगार मेळावे आयोजित करणार - आमदार...

बहुजन समाजातील युवकांसाठी राज्यभर प्रशिक्षण आणि बेरोजगार मेळावे आयोजित करणार – आमदार अमित गोरखे महाराष्ट्रभरात बहुजन संवाद यात्रेला युवकांचा प्रचंड प्रतिसाद

spot_img

बहुजन समाजातील युवकांसाठी राज्यभर प्रशिक्षण आणि बेरोजगार मेळावे आयोजित करणार – आमदार अमित गोरखे

महाराष्ट्रभरात बहुजन संवाद यात्रेला युवकांचा प्रचंड प्रतिसाद

नागपूर, दि ३० ऑगस्ट २०२४  नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांच्या बहुजन संवाद यात्रेला राज्यभर बहुजन समाजातील युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .याच निमित्ताने बहुजन समाजातील युवकांसाठी राज्यभर प्रशिक्षिण व बेरोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे आज मुंबई या ठिकाणी आमदार अमित गोरखे यांनी जाहीर केले.

गेल्या महिन्याभरपासून गोरखे हे बहुजन संवाद यात्रेनिमित राज्यभर दौरा करित आहेत .आतपर्यंत त्याचे १२ जिल्हे आणि जवळपास ६२ तालुक्यात त्यांची संवाद यात्रा पोहचली. बहुजन समाजाचे नवनिर्वाचित आमदार अमित गणपत गोरखे यांना इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज रोजी उपेक्षित असलेल्या बहुजन (हिंदू मातंग) समाजातील नागरिकांना कुठल्याही राजकीय पक्षाने ना लोकसभा ना विधान परिषदेची संधी दिली.

परंतु बहुजन समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष यांनी अनुसूचित जाती समाजाचे युवकांचे प्रेरणास्थान असलेले पिंपरी चिंचवड येथील अमित गणपत गोरखे यांना उमेदवारी देऊन बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. विशेष म्हणजे उपेक्षित मातंग समाजाला विधान परिषदेची संधी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यभर विविध सामाजिक संघटनेच्या वतीने व समाज बांधवांच्या वतीने विशेष करून भारतीय जनता पक्षाचे लोकनेते तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह सर्व भाजपा महायुतीचे विशेष करून सर्व पक्ष श्रेष्ठींचे समाज बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आलेले आहे.

युवा नेते असलेले आमदार अमित गोरखे यांनी आमदारकीचा पदभार स्वीकारल्यानंतर लागलीस ०३ ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यभर “बहुजन संवाद यात्रा” सुरू केलेले असून ही यात्रा ५ सप्टेंबर पर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष करून बहुजन समाजातील बौद्ध वस्ती, मातंग वस्ती,चर्मकार, ढोर, मदिगा समाज,वाडी-वस्ती, तांडा व उपेक्षित वंचित परिसरामध्ये प्रत्यक्षपणे भेट देऊन तेथील बहुजनांचे असलेले सर्वसामान्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य,विषयक असलेल्या अडीअडचणी आमदार अमित गोरखे हे जाणून घेत आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये ०३ ऑगस्ट पासून सुरू झालेली बहुजन संवाद यात्रा ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथून सुरुवात झालेली असून या यात्रेला बहुजन समाजाच्या वतीने उदंड प्रतिसाद समाज बांधवांच्या वतीने देण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आमदार अमित गोरखे यांचे मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक तर काही ठिकाणी मोठ्या क्रेन द्वारे हार लावून जोरदार फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये स्वागत करण्यात आले आहे, तसे पाहिले तर आज बहुजन समाजा चे आमदार अमित गोरखे हे युथ आयकॉन ठरलेले असून भविष्यामध्ये त्यांच्या असलेल्या ” एकच ध्यास, फक्त बहुजन समाजाचा विकास ” या घोषवाक्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या बहुजन संवाद यात्रेला मिळत आहे.

या यात्रेचा सुभारंभ अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून करण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रातील मावळ, पुणे ,बारामती, दौंड, नारायणगांव,चाकण कोल्हापूर,सांगली,सातारा तसेच उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, धाराशिव, कळंब , छ.संभाजीनगर जालना , नांदेड, लातूर , उदगीर विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यामध्ये बहुजन संवाद यात्रेच्या निमित्ताने आमदार अमित गोरखे पोहोचले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...