बहुजन समाजाचं प्रामुख्याने मातंग समाजाचं नेतृत्व करणारे आमदार अमित गोरखेसर यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे.- पिंपरी चिंचवड मातंग समाजाची मागणी
पिंपरी – प्रतिनीधी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडीतील स्मारकाच्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव करण्यात आला.
या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व करत असलेले विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमितजी गोरखे सर यांची मंत्रिमंडळामध्ये निवड करण्यात यावी अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला. या ठरावाला सर्वांनी एकमुखाने संमती दिली.
यावेळी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, संदिपान झोंबाडे, शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, सा.लो अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष अरूण जोगदंड,संजय ससाणे नितीनजी घोलप, शिवाजीराव साळवे ,राजु आवळे,आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटोळे, धीरज सकट, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, मारुती जाधव, ज्योती ताई शिंदे,शंकर खवळे, सुनिता ताई वाणी,सुनिल भिसे,स्वत्निल गायकवाड,सुदाम धोंगडे,शकुंतला कसबे,व सोनाली अडागळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.