गुन्हेगारीबन्सी महाराज मिठाईवाले धीरज जोशी हल्ला प्रकरणातील आरोपींना कुशलतेने अटक केल्याबद्दल मिठाईवाले...

बन्सी महाराज मिठाईवाले धीरज जोशी हल्ला प्रकरणातील आरोपींना कुशलतेने अटक केल्याबद्दल मिठाईवाले परिवाराने पोलीस अधीक्षकांसह LCB टीमचा केला सत्कार

spot_img

बन्सी महाराज मिठाईवाले परिवाराने केला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांचा केला सत्कार हल्लेखोर हे चालाख असल्याने कोणत्याही प्रकाराचा सुगावा ठेवला नव्हता, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या कार्य कुशलतेने आरोपींचा मागकाढून त्यांना जेरबंद केले.

बन्सी महाराज मिठाईवाले परिवाराने नगरकरांचा जिल्हा पोलीस दलावरती विश्वास वाढल्याची व्यक्त केली भावना

नगर : – बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे संचालक धीरज जोशी यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता. तत्काळ पोलीस अधीक्षक व राकेश ओला यांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी करून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासकामी योग्य त्या सूचना व वेळोवेळी मार्गदर्शन करून तपासणीची चक्रे फिरवत हल्ला करणार्या आरोपींना अटक केल्याबद्दल बन्सी महाराज मिठाईवाले जोशी परिवाराने जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर ,पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, मेघराज कोल्हे,संदीप पवार, फुरकान शेख, प्रशांत राठोड, विशाल दळवी, रोहित मिसाळ रवींद्र घुंगासे,रणजीत जाधव, संतोष खैरे,सागर ससाने,संभाजी कोतकर,अर्जुन बडे या तपास करणाऱ्या पोलीस कर्मचार्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अशोक जोशी, राजकुमार जोशी,गोविंद जोशी, मनोज जोशी, राजाभाऊ पोतदार, किशोर जोशी, बाली जोशी, सोमनाथ मुळे, सौ.कोमल शर्मा, अवंती जोशी, अनिल आहेर, राहुल फुलडहाळे आदि उपस्थित होते.याप्रसंगी राजकुमार जोशी म्हणाले, आमच्या परिवाराचे सदस्य धीरज जोशी यांच्यावर गेल्या आठवड्यात काही एक कारण नसतांना अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता.

याबाबत आम्ही रितसर तक्रार पोलिसांकडे दाखल केली. यावेळी बन्सी महाराज मिठाईवाले परिवाराला अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी धीर देण्याचे काम केले. हल्लेखोर हे चालाख असल्याने कोणत्याही प्रकाराचा सुगावा ठेवला नव्हता, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या कार्य कुशलतेने आरोपींचा मागकाढून त्यांना जेरबंद केले.
पोलिसांनी तपासासाठी खूप मेहनत घेऊन आरोपींना अटक केली, याबद्दल जोशी परिवार संपूर्ण टिमचे मनापासून आभार मानतो. आरोपी अटक झाल्यामुळे पोलिसांबद्दल जनतेचा विश्वास अधिकदृढ झाला असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला म्हणाले, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे चोख काम पोलिस प्रामाणिकपणे करत आहे. आरोपी कितीही हुशार आणि चालाख असले तरी प्रत्येक गुन्ह्यांच्या खोलापर्यंत जाऊन आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहोत. धीरज जोशी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी अटक करणे हे आमच्यासाठी आव्हान होते, या (तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे स्वतः टीमचे नेतृत्व करत होते सोबत दुसरी घटना श्रीगोंदा पारगाव येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातीली देवाच्या गाभाऱ्यातील सर्व चांदीचे दागिने चोरीला गेले होते त्या घटनेचा तपास सुद्धा या कालखंडामध्ये सुरू होता या घटनेचा तपास सुद्धा तात्काळ पोलिसांनी लावून मंदिराचे दागिने चोरणाऱ्यांना मोठ्या सीताफिने ताब्यात घेतली होते. त्यांच्या पूर्वीच्या अनुभवाने आरोपीला जेरबंद करण्यात यश आले) सर्व टिमने चॅलेंज स्विकारत, आरोपींना अटक केली.

यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आव्हान केले की नागरिकांनीही आपल्या अडचणीसंदर्भात पोलिसांशी थेट संपर्क साधावा, गुन्हा तात्काळ दाखल करण्यास पुढे येऊन पोलिसांना तपासात सहकार्य करून झालेल्या घटनेत त्या सोडविण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सांगितले सांगितले.

यावेळी अशोक जोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी सर्व टिम सदस्यांचा सत्कार करुन मनःपुर्वक आभार मानले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...