राजकारण'फायर ब्रँड' नेते वसंत मोरे यांनी सोडली राज ठाकरेंची 'मन'से साथ ;...

‘फायर ब्रँड’ नेते वसंत मोरे यांनी सोडली राज ठाकरेंची ‘मन’से साथ ; नेत्यावर आणि पक्षावर राग नाही ; पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांवर मोरेंनी केले गंभीर आरोप…!

spot_img

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘फायर ब्रँड’ नेते वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली. परंतु पक्षाची पुण्यात फारशी ताकद नसल्यानं ही निवडणूक लढवू नये, असा अहवाल पुण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना पाठवला. मनसेकडून डावललं जात असल्यामुळे मोरे आधीच नाराज होते. त्यातच पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या या अहवालाची भर पडली आणि मनसेचे ‘फायर ब्रँड’ नेते वसंत मोरे यांनी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची ‘मन’से साथ सोडत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मोरे म्हणाले, ‘पुण्यातल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून मला सतत डावलण्यात आलं. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देऊन भविष्यासाठी तयारी करत असताना त्या कार्यकर्त्यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अडवणूक केली. नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या या गलिच्छ राजकारणाला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे’.

दरम्यान, वसंत मोरे यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पक्षाच्या स्थापनेपासूनच ते मनसेसोबत आहेत. पुण्यातल्या कात्रज मतदार संघातून ते तीन वेळा महापालिकेत निवडून गेले आहेत. विरोधी पक्षनेता या पदासह गटनेते हे पददेखील त्यांनी भूषवलं आहे.

तीन वर्षांपूर्वी मोरे यांच्याकडे पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. या भूमिकेला मोरे यांनी विरोध केल्यानं अध्यक्षपरावरुन त्यांची गच्छंती करण्यात आली होती. त्याचवेळी ते पक्ष सोडतील, अशी चर्चा होती. पण ते थांबले होते. 

लोकसभा लढवण्याची मनसेची अपेक्षित अशी ताकद नाही, असा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आल्यानं मोरे नाराज होते. या निवडणुकीचं सर्वेक्षण करताना आपली ताकद नाही, असं सांगा, अशा प्रकारे शाखाप्रमुखांना सांगण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप मोरे यांनी केला आहे. दरम्यान, मोरे हे दोन दिवसात त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...