युवा विश्वफटाक्यांच्या आतिषबाजीत नवी कोरी कार जळून झाली खाक...!

फटाक्यांच्या आतिषबाजीत नवी कोरी कार जळून झाली खाक…!

spot_img

नगर – जामखेड रस्त्यालगतच्या सांडवा फाटा इथं आज (दि. २) दुपारी भर उन्हात एक दुर्दैवी घटना घडली. एका लग्नात हा प्रकार घडला. मंगलाष्टका झाल्यानंतर करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत एक नवी कोरी कार जळून खाक झाली. सांडवा फाटा इथं एका मंगल कार्यालयात आज (दि. २) लग्नाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मंगलाष्टका झाल्यानंतर नवरदेवाच्या मित्रांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वाळलेल्या गवतानं पेट घेतला. या ठिकाणी एका झाडाखाली नवी कोरी कार ‘पार्क’ करण्यात आली होती. प्रचंड उन्हात ही आग चांगलीच भडकली आणि क्षणार्धात नवी कार जळून गेली.

दरम्यान, या कारजवळ अनेक वाहनं लावण्यात आली होती. आगीची घटना निदर्शनास येताच ती वाहनं ताबडतोब काढून घेण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे नव्या कोऱ्या कारच्या मालकाला मात्र लग्नातलं हे विघ्न मनावर दगड ठेवून सहन करावं लागलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...