7 सीटर कार स्वस्त दरांत विकत घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. अशा ग्राहकांसाठी किआ कार Kiya car
हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही आता दोन लाख रुपये भरून ही कार तुमच्या घरी नेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला किती रुपयांचं कर्ज मिळेल आणि त्या कर्जाचा हप्ता किती असेल ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
Kia Carens प्रीमियम पेट्रोल मॅन्युअलची एक्स-शोरूम किंमत फक्त 10.52 लाख रुपये आहे. एक रकमी पैसे देऊन ते विकत घेण्याऐवजी तुम्ही फायनान्सदेखील मिळवू शकता. या कारचं 1497 cc पेट्रोल इंजिन आहे, जे 113.42 bhp ची कमाल पॉवर आणि 144 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
तुम्ही कॅरेन्स प्रीमियम पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर 5 वर्षांसाठी कर्ज घेतलं आणि तुम्हाला बँकेकडून 9 टक्के व्याजदरानं कर्ज मिळालं तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 21 हजार 174 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.