प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना अभिनव जीवन गौरव पुरस्कार जाहीर: पुण्यात उद्या होणार वितरण
अहिल्यानगर ( प्रतिनिधी) प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना मानाचा अभिनव जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यातल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम मध्ये या पुरस्काराचे वितरण उद्या मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
महाराष्ट्र शासन अनुदानित भारतीय कला प्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शन कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
या महाविद्यालयात मूलभूत अभ्यासक्रमाबरोबरच रेखा कला आणि रंग कला उपयोजित कला कला शिक्षक पदविका डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन असे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळे या महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनासाठी विविध स्तरातून मान्यवर कलाप्रेमी विद्यार्थी उपस्थित असतात.
महाविद्यालय दरवर्षी कलाक्षेत्रात आपले अलौकिक असे योगदान देणाऱ्या कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविते यावर्षी यासाठी प्रमोद कांबळे यांची निवड करण्यात आली आहे त्याबाबतचे पत्र प्राचार्य राहुल भीमराव बळवंत यांनी कांबळे यांना दिले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून प्रमोद कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.