प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी उकळले दीड लाख; पीआयसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध धुळे एसीबीचा यशस्वी ‘ट्रॅप’ …!
एका तक्रारदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती दीड लाख रुपयांची लाच घेताना एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस हवालदार यांच्याविरुद्ध धुळे विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीनं लावण्यात आलेल्या सापळ्यात एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस हवालदार अडकले.
दत्तात्रय सखाराम शिंदे (पद – पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा, धुळे ( वर्ग- 1) , रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड) 2) नितीन आनंदराव मोहने, पद – पोलीस हवालदार 334, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, (वर्ग- 3), रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे), अशोक साहेबराव पाटील, वय 45 वर्ष, पद – पो. हवालदार 1629, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे. ( वर्ग – 3) रा. – प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे)
प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी दि. 01. 04. 2024 रोजी 2,00,000/-रुपयांची लाच मागितली. मात्र तडजोडीअंती दि. 01.04.2024 रोजी 1 लाख 50 हजार रुपयांची लाच स्विकारली गेली.
यातील नमूद तक्रारदार यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम आलोसे क्र 2 व आलोसे क्रमांक 3 यांना देण्यास सांगितले.
सदर लाच रक्कमेबाबत तक्रारदार यांनी आलोसे क्रमांक 2 व आलोसे क्र 3 यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती 1 हजार 50 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करुन पंचांसमक्ष वरील लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
वरील आरोपी लोकसेवक 1 ते 3 यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन (जिल्हा – धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतबंधक विभागाचे श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षण अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उपअधिक्षक सापळा अधिकारी
रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पोलीस हवालदार राजन कदम, पो.ना. संतोष पावरा, पोलीस शिपाई रामदास बारेला, चालक पो. शि. बडगुजर (सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे) यांनी केली.