गुन्हेगारीपोलीस स्टेशनला तकार दिल्याचा राग मनात धरून हत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी...

पोलीस स्टेशनला तकार दिल्याचा राग मनात धरून हत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपींना ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. मा. श्री व्ही.एच. पाटवदकर साहेब, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश २ बीड यांचा महत्वपूर्ण निकाल

spot_img

पोलीस स्टेशनला तकार दिल्याचा राग मनात धरून हत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपींना ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

मा. श्री व्ही.एच. पाटवदकर साहेब, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश २ बीड यांचा महत्वपूर्ण निकाल

बीड/प्रतिनिधी – पोलीस स्टेशन येथे तकार दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही.एच. पाटवदकर साहेब यांनी आरोपी १) मोमीन वहाब नवाब, २) मोमीन मोसीन नवाब, ३) मोमीन वसीम / हाजी नवाब, ४) शहनाज बेगम नवाब मोमीन सर्व रा. खाजानगर, मोमीनपुरा, पेठबीड यांना कलम ३२६, ३२४ भा.द.वि. सह कलम ३४ मध्ये दोषी ठरवून कलम ३२६ भा.द.वी अन्वये प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावास व ५००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. व दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

प्रस्तुत प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की, दि. १७/०९/२०२१ रोजी रात्री ०८.०० वा चे सुमारास फिर्यादी घरी असताना आरोपी फिर्यादीच्या घरासोर येउन फिर्यादीस बाहेर बोलावुन घेउन पोस्टे पेठ बीड येथे आमच्या विरूद्ध तकार का दिली असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी आरोपी मोमीन वहाब याने फिर्यादीच्या गच्चीस पकडले आणि मोमीन वहाब याची आई हिने जिवंतच मारते असे म्हणून भाजी कापन्याची लाकडी विळी ही गळयावर मारत असताना फिर्यादीने वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता सदर विळी ही फिर्यादीच्या दाताला लागून दाताचा तुकडा पडला तसेच इतर आरोपीनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने मानेवर, पाठीवर, हातावर, डोळयाच्या खाली जबडयावर मारून गंभीर जखमी केले त्यामुळे फिर्यादी चक्कर येउन खाली पडला.

फिर्यादीने दिलेल्या अशा आशयाच्या फिर्यादीवरून गु.र.न ८६/२०२१ कलम ३०७,३२६,३२५,५०४,३४ भा.द.वि प्रमाणे पेठ बीड पो. स्टे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास राजेंद्र भास्कर बनकर, पोलीस उपनिरीक्षक, पोस्टे पेठ बीड यांनी केला. तपासादरम्यान सदरच्या गुन्हयात आरोपी १) मोमीन वहाब नवाब, २) मोमीन मोसीन नवाब, ३) मोमीन वसीम / हाजी नवाब, ४) शहनाज बेगम नवाब मोमीन सर्व रा. खाजानगर,मोमीनपुरा, पेठबीड यांना अटक करण्यात आली. तपासकामी सदर आरोपीकडुन गुन्हयाच्याकामी वापरलेली हत्यारे हे आरोपीच्या सांगण्यावरून जप्त करण्यात आले. तपासा नंतर आरोपी विरूद्ध मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, बीड यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्या नंतर प्रकरण मा. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड येथे वर्ग करण्यात आले.

सदर प्ररकणाची साक्षीपुरावा व सुनावणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एच. पाटवदकर साहेब यांच्या समोर झाली. सदर प्रकरणात आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकुण ०६ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात फिर्यादी यांचा जबाब व इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा यांचे अवलोकन करून व जिल्हा सरकारी वकिल अॅड. अजय तांदळे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर साहेब यांनी प्रकरणातील आरोपी १) मोमीन वहाब नवाब, २) मोमीन मोसीन नवाब, ३) मोमीन वसीम / हाजी नवाब, ४) शहनाज बेगम नवाब मोमीन सर्व रा. खाजानगर, मोमीनपुरा, पेठबीड यांना कलम ३२६, ३२४ भा.द.वि. सह कलम ३४ मध्ये दोषी ठरवून कलम ३२६ भा.द.वी अन्वये प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावास व ५००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. व दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात पोलिस अधिकारी पो उपनि बाबासाहेब जायभाये, कोर्ट कर्मचारी ए.एस.आय पी.एस गव्हाणे, कोर्ट ड्युटी पोउपनि सय्यद जाकर यांनी त्यांना सहकार्य केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...