गुन्हेगारीपुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यावर कुस्तीच्या फडात जीवघेणा हल्ला

पुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यावर कुस्तीच्या फडात जीवघेणा हल्ला

spot_img

 पुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यावर कुस्तीच्या फडात जीवघेणा हल्ला

धाराशिव – जिल्ह्यातील आंदरूड गावात आयोजित कुस्ती फडात पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर थेट हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घायवळ हा कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर वाशी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 351(2) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती सुरू असतानाच अचानक एक कुस्तीपटू धावत आला अन् त्याने निलेश घायवळवर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा अनपेक्षित होता की, सुरुवातीचे काही क्षण नेमकं काय झालं हे कुणालाही समजलं.गर्दीचा फायदा घेत कुस्तीपटूने निलेश घायवळवर हल्ला केला. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे, हा हल्ला दुसऱ्या कुणाकडून नव्हे तर थेट एका पहिलवानाकडून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
निलेश घायवळ: पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास
निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातील कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी, अपहरण यांसारखे २३ ते २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गजानन मारणे या गुंडाच्या टोळीत कार्यरत होता, परंतु नंतर दोघांमध्ये वर्चस्वाच्या वादामुळे फूट पडली आणि त्यांनी स्वतंत्र टोळ्या स्थापन केल्या. या टोळ्यांमधील संघर्षामुळे पुणे आणि परिसरात अनेक हिंसक घटना घडल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...