राजकारणपालघर लोकसभा मतदार संघातून कल्पेश भावर यांना ‘जिजाऊ’ ची उमेदवारी.. ...

पालघर लोकसभा मतदार संघातून कल्पेश भावर यांना ‘जिजाऊ’ ची उमेदवारी.. पाच वर्षात पालघरचा कायापालट करण्याची सांबरे यांची ग्वाही; परिवर्तनासाठी विश्वास ठेवण्याचे आवाहन

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ संघटनेच्या वतीने कल्पेश भावर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी ही उमेदवारी जाहीर करून पुढच्या पाच वर्षात पालघर जिल्ह्याचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. परिवर्तनासाठी माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पालघर लोकसभा मतदारसंघात जिजाऊ संघटना निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांबरे यांनी जाहीर केले होते. त्यासाठी भिवंडी, वासिंद, वाडा, पालघर, ठाणे, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी निर्धार मेळावे घेतले. या मेळाव्यांना लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती.

जनतेचा कौल घेऊन रिंगणात
जनतेचा कौल लक्षात घेऊनच जिजाऊ संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. सांबरे यांनी समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजकीय पद गरजेचे असते यावर भर दिला. आज कोणतेही पद नसताना स्वकमाईतून लाखो लोकांची सेवा करून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. त्यामुळे आता जिजाऊ संघटनेचा प्रतिनिधी म्हणून पालघर जिल्ह्यात सामाजिक जाण असलेले उच्चशिक्षित आणि सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या कल्पेश भावर यांना उमेदवारी देण्याची घोषणा सांबरे यांनी केली.

जनहितासाठी राजकारणात
पालघर लोकसभा मतदारसंघातून भावर यांना शंभर टक्के निवडून आणू. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या हक्कासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सत्तेमध्ये बदल आवश्यक असतो. माझे कोणत्याही पक्ष किंवा व्यक्तीशी मतभेद नाहीत. मी केवळ जनतेच्या हितासाठी राजकारणात प्रवेश करीत आहे, असे सांगून सांबरे म्हणाले, की शिक्षण, आरोग्य रोजगार या समाजाच्या मूलभूत गरजा आहेत व त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे. त्यासाठीच लोकसभेच्या निवडणुकीत उतरून, संसदेच्या माध्यमातून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडून, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

दीनदुबळ्यांच्या सेवेला प्राधान्य
लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, असे स्पष्ट करताना सांबरे म्हणाले, की मी जनतेला विचारतो, की ज्या सुखसोई खासदार झाल्यावर मला मिळणार आहेत, त्या आत्ताच माझ्याकडे आहेत. मी माझ्या आयुष्यात कष्टाने व जिद्दीने भरपूर मिळवले आहे. आत्ताही मी निवांत आणि ऐषारामात परदेशात फिरून उर्वरित आयुष्य घालवू शकतो. दिवस रात्र धावपळ करण्याची मला आवश्यकता नाही; परंतु जनतेच्या प्रश्नांसाठी मी राजकारणात आलो आहे. राजकारणात सुख उपभोगण्यासाठी आलेलो नाही तर दीनदुबळ्या, वंचित समाज बांधवांना त्यांचा हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी ही निवडणूक जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून लढवण्याचा हेतू आहे असे सांबरे यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या आरोग्य सेवांना प्राधान्य
पालघर जिल्हा आदिवासी आणि दुर्गम आहे. या जिल्ह्यात महिलांना नीट आरोग्य सेवा मिळत नाही. कुपोषण होते. आज महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जिल्ह्यातील महिलांची विशेषतः गर्भवती महिलांची आरोग्य सुविधांअभावी होणारी ससेहोलपट मी पाहिली आहे. त्यांना आरोग्य सुविधा व अन्य सुविधा मिळवून देण्यासाठी कोणताही माणूस जिजाऊ संघटनेवर विश्वास ठेवून मतदान करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...