राजकारणपालघर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करणार

पालघर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करणार

spot_img

पालघरः (योगेश चांदेकर) निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक जाहीर केल्याने पालघर लोकसभा मतदारसंघाची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. राज्याच्या शेजारील दादरा नगर हवेली व गुजरातच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आदर्श संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती देताना ते म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आदी या वेळी उपस्थित होते.

२६ एप्रिलला अधिसूचना
पालघर व लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलला अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. तीन मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. चार मे रोजी उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे. सहा मे रोजी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची संधी आहे. वीस मे रोजी मतदान असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, बोईसर, नालासोपारा, वसई पालघर अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये २२५० मतदान केंद्रातून १३ सहाय्यक मतदान केंद्र असणार आहेत.

पाच मतदान केंद्रे संवेदनशील
पालघर जिल्ह्यात पाच संवेदनशील मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासनाचे अतिशय बारकाईने लक्ष असणार आहे. कोसबाड भागातील १२४ ते १२७ मतदान केंद्र, पालघरमधील २३ क्रमांकाचे मतदान केंद्र संवेदनशील आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २१ लाख ६८९ मतदार असून यामध्ये दहा लाख ९९ हजार ७४३ पुरुष तर दहा लाख ७२९ महिला मतदार आहेत. २१७ तृतीयपंथी मतदार आहेत, तर जिल्ह्यात ३२६ नोकर मतदार आहेत. जिल्ह्यात १५ हजार ८४८ दिव्यांग मतदार असून त्यापैकी नऊ हजार ९७ पुरुष तर ६७९ महिला आहेत. दोन तृतीयपंथी मतदार आहेत.

वृद्धांच्या घरून मतदानाची व्यवस्था
मतदान केंद्रात येऊ न शकणाऱ्या ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना तसेच दिव्यांगांना घरून मतदान करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी निवडणूक विभागाने व्यवस्था केली आहे प्रशासन त्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. जिल्ह्यातील सहा मतदारसंघासाठी २२६३ मतदान केंद्रावर ईव्हीएम कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत जिल्ह्यात २७२३ ची आवश्यकता असून यापैकी आवश्यकता असून त्यापेक्षा जास्त म्हणजे ४७७ बॅलेट प्रशासनाकडे उपलब्ध आहेत, तर २७२३ कंट्रोल युनिटची आवश्यकता असताना ३१४४ कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. २९२५ व्हीव्हीपॅट मशीनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ३३५७ मशीन उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

आचारसंहिता पालनासाठी नियंत्रण कक्ष
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासन सज्ज असून निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी दखल घेण्यात येणार असून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामार्फत स्टॅटिक सर्व्हिलियंस, व्हिडिओ सर्व्हिलियन्स, व्हिडिओ विविंग टीम व फ्लाईंग स्क्वाड नेमण्यात आले आहेत. मतदानाच्या दहा दिवस अगोदर नवमतदारांना मतदार होण्याची व नाव नोंदवण्याची संधी उपलब्ध आहे. जिल्ह्यात किंवा जिल्हा राज्याबाहेरचा स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्यासाठी जिल्ह्यात नाव असलेल्या ठिकाणी येऊनच मतदान करावे लागेल. त्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...