राजकारणपालघर लोकसभा आता तिरंगी लढत अटळ..! बहुजन विकास आघाडीचा लोकसभा लढवण्याचा...

पालघर लोकसभा आता तिरंगी लढत अटळ..! बहुजन विकास आघाडीचा लोकसभा लढवण्याचा निर्णय.. तिरंगी लढतीचा फायदा महायुतीला? हितेंद्र ठाकूर यांची खेळी चक्रावून टाकणारी..

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने या लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता असून त्याचा फायदा भाजप महायुतीला होण्याची शक्यता आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघरमधून बहुजन विकास आघाडीचा खासदार झाला होता. त्यानंतरच्या सर्व निवडणुकात बहुजन विकास आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेते याकडे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींचे लक्ष होते.

महायुतीला साथ, तरी उमेदवार
आता हितेंद्र ठाकूर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पालघर लोकसभा मतदारसंघात असेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही दिवसापासून बहुजन विकास आघाडीने उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेतल्या. पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकार क्षेत्रावर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. ठाकूर यांनी विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. आताही महायुती सरकारला त्यांचा पाठिंबा आहे.

विकासकामांवरच प्रचार केंद्रीत राहणार
या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी उतरणार नाही अशी चर्चा होती; परंतु गेल्या काही दिवसातील राजकीय चित्र झपाट्याने बदलले. बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते व संघटक अजीव पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी विजयाचा दावा केला आहे. बहुजन विकास आघाडी ही पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित असून त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा विकासकामे हाच असतो.

महायुती, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कांबडी यांच्या उमेदवारीबाबत ठाकरे यांनी सूतोवाच केले असले, तरी अद्याप महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीतही ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे राहणार की भाजप या जागेवर कब्जा करतो, हे आज उद्या ठरण्याची शक्यता आहे.

बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचे नावही गुलदस्त्यात
बहुजन विकास आघाडीने या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने राजकीय तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. असे असले, तरी बहुजन विकास आघाडीने मात्र आपल्या उमेदवाराचे नाव अजून गुलदस्त्यात ठेवले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटले आहेत. त्यामुळे आता बहुजन विकास आघाडीला आपली ताकद नेमकी किती याची चाचपणी करण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी तसेच महापालिका निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक ही लिटमट टेस्ट ठरेल.

पालघर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार
पालघर लोकसभा मतदारसंघातून अद्याप एकाही उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसले, तरी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीकडून आ. राजेश पाटील, भाजपकडून डॉ.हेमंत सावरा, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भारती कांबडी यांची नावे चर्चेत आहेत. आ. राजेश पाटील यांनी भूसंपादनातील घोटाळ्यांचा पर्दाफाश केला होता. स्थानिकांच्या प्रश्नांवर ते कायम आवाज उठवीत आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...