राजकारणवाढवण गावात जाऊन कामडी यांची भावनिक साद वाढवण बंदराचा विनाशकाली म्हणून...

वाढवण गावात जाऊन कामडी यांची भावनिक साद वाढवण बंदराचा विनाशकाली म्हणून उल्लेख बंदर कधीही होऊ देणार नाही, असा निर्धार

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी थेट वाढवण गावात जाऊन वाढवण बंदराला असलेला आपला विरोध प्रदर्शित केला. वाढवणवासीयांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी केला.

पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या वाढवण बंदर हा चर्चेचा विषय झाला असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदर विरोधकांना दलाल असे संबोधल्यामुळे हा विषय अधिकच तापला आहे. या पार्श्वभूमीवर कामडी यांनी थेट वाढवण गावात जाऊन वाढवण बंदराविषयीची आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

ठाकरे यांची भूमिका तीच महाविकास आघाडीची भूमिका- वाढवण बंदराला विरोध का आहे, याबाबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कामडी म्हणाल्या, की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसरच्या सभेत वाढवण बंदराबाबत आपण स्थानिक लोकांसोबत आहोत हे स्पष्ट केले असून कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होऊ देणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली आहे. हीच आमची महाविकास आघाडीची भूमिका आहे. वाढवण बंदर हे विनाशकाली आहे. काही अघटित घडले, तर त्याचा परिणाम संपूर्ण पालघर जिल्ह्याला भोगावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

बंदराविरोधात ठाम भूमिका- आपण स्वतः वाढवण बंदरांपासून वीस किलोमीटर अंतरावर राहत आहोत. या बंदराचे दुष्परिणाम आणि पर्यावरणीय नुकसान याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे बंदर होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून वाढवण बंदराला जसा विरोध केला आहे, तसाच खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या बंदराला आपला कायम विरोध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा विकासासाठी माझ्याबरोबर- पालघर जिल्हा हा विस्ताराने अतिशय मोठा आहे. आपल्याकडे संपर्कासाठी वेळ कमी आहे, तरी अधिकाधिक लोकांशी संपर्क करण्याचा माझा प्रयत्न आहे. आमचे कार्यकर्ते सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करतील; परंतु ते शक्य नसले, तरी तरी वाढवण बंदर तसेच पालघर जिल्ह्यातील अन्य प्रश्नांसाठी तुम्ही माझ्यासोबत आहात, असा विश्वास कामडी त्यांनी व्यक्त केला.

सेवेतून उपकृत करण्याची संधी – जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना देशभर नव्हे, तर जगभर कोरोनाची लागण झाली. रात्री, अपरात्री लोकांचे फोन यायचे. मदत लागायची. या सर्व काळात परमेश्वराने आपल्याकडून जनतेची सेवा करून घेतली. आता या सेवेतून उपकृत करण्याची संधी जनतेला आहे आणि पालघरच्या विकासासाठी ही संधी जनता नक्की देईल, असा विश्वास कामडी यांनी या वेळी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...