राजकारणपालघर मतदार संघ भाजपला जाणार?  राजेंद्र गावित यांनाच भाजप उमेदवारी देण्याची शक्यता.....

पालघर मतदार संघ भाजपला जाणार?  राजेंद्र गावित यांनाच भाजप उमेदवारी देण्याची शक्यता.. मतदार संघाबाबत अंतिम निर्णय लवकरच..!

spot_img

पालघरः लोकसभेच्या निवडणुका सुरू होऊन पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या तीन आठवड्यावर आलेअसताना अजून महाराष्ट्रातल्या २२ जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यात पालघरच्या जागेचाही समावेश आहे; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि कल्याण या तीन जागा पदरात पाडून घेतल्या असताना नाशिक आणि पालघर मतदार संघ मात्र मित्र पक्षाला देण्याचे ठरवण्यात आले असल्याचे समजते.

दरम्यान, प्रदीर्घकाळ बैठका झाल्यानंतर शिवसेनेचा शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात काही तडजोडी झाल्या. त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडताना त्या बदल्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडण्यात आला आहे.

आयात करून गावितांनाच उमेदवारी?
छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि कल्याण हे शिवसेनेचे तीन बालेकिल्ले सांभाळताना त्या बदल्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडले असल्याचे सांगण्यात येते. पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडला, तर या मतदारसंघातून डॉ हेमंत सवरा, विलास तरे, संतोष जनाथे आणि माजी आमदार पास्कल धनारे यांच्या पत्नी मीना हे तिघे इच्छुक आहेत; परंतु मतदारसंघ बदलताना उमेदवार आयात करण्याबाबत अनेक ठिकाणी निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार पालघर लोकसभा मतदारसंघाचा निर्णय होण्याची शक्यता आहे

मतदारसंघ सोडताना उमेदवारही घेण्याचे संकेत
शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देताना या मतदारसंघासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने शिवाजीराव आढळराव पाटील हे आपले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटात नेऊन घातले आहेत. असाच प्रकार अन्य काही मतदारसंघातही होत असून त्यात पालघरचे नाव घेतले जाते.

पक्ष बदलला, तरी उमेदवार तोच ठेवण्याचा पालघरचा इतिहास
पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित हे भाजपकडून निवडून आले होते; परंतु मागच्या निवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडताना भाजपने गावित यांना शिवसेनेत प्रवेश घ्यायला लावून तिथून खासदार केले. आताही तसेच ठरत असून खासदार गावित यांचा पालघर जिल्हा निर्मितीत असलेला सिंहाचा वाटा तसेच त्यांनी मतदारसंघात केलेली मोठमोठी विकासकामे लक्षात घेऊन गावित यांना भाजपत प्रवेश करायला लावून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दोन दिवसांत अंतिम निर्णय
महायुतीत अजून काही मतदारसंघाबाबत तिढा असून हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, हे ठरल्यानंतरच तेथे कोण उमेदवार असेल हे स्पष्ट होईल; परंतु कितीही नावे चर्चेत असली, तरी खा. गावित यांचेच नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...