राजकारणपारनेर तालुक्यातील वनविभागाच्या कामात भ्रष्टाचार? चौकशी ची मागणी..

पारनेर तालुक्यातील वनविभागाच्या कामात भ्रष्टाचार? चौकशी ची मागणी..

spot_img

अंकुश शिंदे / श्रीगोंदे : पारनेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या राळेगणसिद्धी, सुपा, भाळवणी, कुरुंद बीटामध्ये जलयुक्त शिवार योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मृदा व जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. सलग समतल चर, माती नाला बांध , रोपवने इत्यादी कामांमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार करून मजुरांच्या खोट्या सह्या करून रक्कम परस्पर हडप करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे.गेल्या वर्षी बांधण्यात आलेले मातीनाला बांध एका वर्षातच फुटून गेले कारण सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आली आहे. अंदाजपत्रकानुसार व  नियमानुसार मातीनाला बांधकामे करण्यात आली नसून अधिकाऱ्यांनी संगणमत करून सदर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. तसेच सलग समतालचर ही कामे मजुरांनी करावयाची असून सुद्धा या ठिकाणी मशीनचा सर्रास वापर करण्यात आला आहे.मजुरांच्या खोट्या सह्या करून ज्यांनी कामच केले नाहीत अशा लोकांच्या नावे रक्कम वर्ग करून काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.यामध्ये प्रामुख्याने वन मजूर, वनरक्षक, वनपाल यांच्या नातेवाईकाच्या नावाने रक्कम काढल्याचे समजत आहे. वरील कामाची सखोल चौकशी करून संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...