अहिल्यानगरच्या (अहमदनगर) टीव्ही सेंटर परिसरात एक सरकारी कार्यालय आहे. नगररचनाकार नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग असं त्या कार्यालयाचं नाव आहे. या कार्यालयात संजय बारगळ नावाचे अधिकारी पायात बूट घालून बिनधास्तपणे भगवान दत्तात्रयाच्या प्रतिमेला अगरबत्ती वळताना दिसत आहेत. तुम्हीच प्रत्यक्ष पहा, हा व्हिडिओ…!
हिंदूंच्या देवतांची विटंबना दुसऱ्या धर्मातल्या कोणी केली तर मोठी आगपाखड केली जाते. परंतु बारगळ आडनावाचा हा अधिकारी स्वधर्मातल्याच भगवान दत्तात्रयांच्या प्रतिमेला अक्षरशः पायातले बूट न काढताच अगरबत्ती ओवाळण्याचा खटाटोप करत आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणारं कृत्य करून या अधिकाऱ्याला अशी कशी ईश्वरप्राप्ती होणार आहे, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
तुम्ही सरकारी अधिकारी असाल. पण भारत सरकार अधिकारी किंवा महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आहात, ब्रिटिश सरकार किंवा पाकिस्तानी सरकारचे अधिकारी तुम्ही नक्कीच नाहीत. मग पायातले बूट न काढता भगवान दत्तात्रयाच्या प्रतिमेला अगरबत्ती ओवाळण्याचं नाटक तुम्ही का करत आहात? पायातले बूट काढून ईश्वराची भक्ती करण्याइतका तुमच्याकडे वेळ नाही का? असे अनेक प्रश्न या अधिकाऱ्याला विचारून खरं तर वरिष्ठांनी या अधिकाऱ्याची चांगलीच कानउघडणी करायला हवी, अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे.