पाथर्डी – (प्रतिनिधी दि.२१) -पाथर्डी तालुक्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये चोरी, दरोडे, पशुधन चोरी, विद्युत मोटार चोरी, वाहन चोरी, कापूस चोरी, शेळ्या चोरी, व जमीन लुटणे, प्लॉट लूटणे, बळजबरीने ताबा घेणे, तसेच शहरात बिहार सारखी परिस्थिती उद्भवली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते ॲड प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
यावेळी बाबासाहेब ढाकणे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरूडे, शिव सेनेचे शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू ढाकणे, शिव सेना उध्दव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष भगवान दराडे, अँड सुनील राजळे, गहिनीनाथ शिरसाट, महेश दौंड, दिनकर पालवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडेकर, राष्ट्रवादीचे युवा शहराध्यक्ष देवा पवार, शहर अध्यक्ष योगेश रासने, अर्जुन धायतडक, संदीप पालवे, उध्दव माने, अंबादास जगताप, आदी उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील गुन्हेगारी मंडळींनी अनेक गोरगरीब नागरिकांना दहशत निर्माण करून त्रास दिला जात आहे. पाथर्डी तालुक्यात व शहरात बिहार सारखी परिस्थिती उद्भवली आहे गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त कडक कारवाई करावी चोरी दरोडे, तसेच व्यापारी पेठेत दांडगे घेऊन फिरने जमीन बळकवणे आशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना जास्त कडक शिक्षा व्हावी. अशी मागणी यावेळी मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी बोलताना अँड प्रताप ढाकणे, म्हणाले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कोणत्याही लोक प्रतिनिधींनी पाठीशी घालू नये पाच वर्षांत शेवगाव पाथर्डीचे बिहार झाले आहे. याला पोलीस आता पुर्ण पदावर आणतील. यावेळी टाकळीमानुर येथील टाकळीमानुर येथील दरोड्यातील आरोपींना अटक केल्या बद्दल पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर गुप्त वार्ता विभागाचे भगवान सानप, अमोल आव्हाड, आदी उपस्थित होते.
पाथर्डी शहरात व परिसरात गुन्हेगाराचे प्रमाण वाढलेले असून नेमके अशा गुन्हेगारांना कोण पाठीशी घालताय यावर पोलिसांनी आता ठोस भूमिका घ्यायला हवी कानून के हात बहोत लंबे होते है हे आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. तसेच पेठेत दोडके घेऊन फिरुन व्यापारीवर दहशत निर्माण करून व हॉस्पिटल वर हल्ला करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी आता स्वतः फिरादी होऊन मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांतून पुढे येऊ लागली आहे.