गुन्हेगारीपहाटे सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांविरुध्द दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल ...!

पहाटे सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांविरुध्द दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल …!

spot_img

पोलीस किती सतर्क असतात, हे पुन्हा एकदा निदर्शनास आलंय. कारण घटनेच्या तब्बल दीड महिन्यानंतर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांची दीड महिन्यापूर्वी वाघोली (पुणे) इथं पहाटे सभा पार पडली होती. या सभेची पोलिसांनी दीड महिन्यानंतर दखल घेत जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीतून मुंबईला उपोषणासाठी जात असताना जरांगे पाटील यांची पुण्यातल्या वाघोलीत पहाटे सभा झाली होती. या सभेसाठी समन्वयकांनी सभेसाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात रितसर अर्जदेखील केला होता. पोलिसांनी समन्वयकांना सूचना दिल्या होत्या.

जरांगे पाटील या सभेला पहाटे चार वाजता आले होते. आयोजकांनी विनापरवाना लाऊड स्पीकर लावून सभा घेत कायद्याचं उल्लंघन केलं. म्हणून पुणे पोलिसांनी दीड महिन्यानंतर (दि. ७) जरांगे पाटील त्याचबरोबर गणेश मस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील यांच्यासह आठ ते दहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...