पवना नदी सुधार प्रकल्पास तत्काळ निधी मंजूर करा
आमदार अमित गोरखे यांची जिल्हा वार्षिक योजना पुणे विभागाच्या राज्यस्तरीय बैठकीला मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी…
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागातील पवना नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी निधी अभावी अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र असल्याची बाब आमदार अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निदर्शनास जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत आणून दिली.
यावेळी या नदीच्या सर्वाधिक फटका हा पिंपरी चिंचवड शहराला बसत असून प्रत्येक वर्षी मामुर्डी, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी
या भागांमध्ये पूर जन्य परिस्थिती निर्माण होत असून पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, या भागातील नागरिकांचे वर्षानुवर्ष पूरजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर स्थलांतर हे करावेच लागते.
त्यामुळे विशेष बाब म्हणून केंद्रासह राज्य शासनाकडून विशेष निधी मिळावा म्हणून सदर बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत तत्काळ पवना नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेशित मनपा आयुक्त शेखर सिंग यांना सूचना दिल्या असून त्यांनी तत्काळ सकारात्मक सहमती दर्शवली असून लवकरच राज्य शासनाने महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रकल्प सुरू होईल सोबतच ईसी प्रमाणपत्र अद्यापही नाही. दसऱ्याची बाब देखील या बैठकीमध्ये अमित गोरखे यांनी सांगितले असून पवना सुधार प्रकल्पास अद्याप राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र (ईसी प्रमाणपत्र) मिळेल.
यावेळी राज्य नगर विकास मंत्री, माधुरीताई मिसाळ ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके राहुल कुल, आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे विभागीय आयुक्त कुलकुंडवार साहेब, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मनपा आयुक्त शेखर सिंग उपस्थित होते.