राजकारणपरीक्षा काळात विद्यार्थी, पालकांना रस्त्यांच्या कामांमुळे अडचणी येणार नाही अशा उपाययोजना कराव्यात......

परीक्षा काळात विद्यार्थी, पालकांना रस्त्यांच्या कामांमुळे अडचणी येणार नाही अशा उपाययोजना कराव्यात… परीक्षेपूर्वी शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित कामे करून घेण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश

spot_img

परीक्षा काळात विद्यार्थी, पालकांना रस्त्यांच्या कामांमुळे अडचणी येणार नाही अशा उपाययोजना कराव्यात…

परीक्षेपूर्वी शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित कामे करून घेण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश

बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

अहिल्यानगर – महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात प्रमुख रस्त्यांवर असलेल्या महाविद्याय व शाळांच्या परिसरात कामे सुरू आहेत. पुढील आठवड्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा काळात रस्त्यांच्या कामामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक, शाळांच्या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये, या दृष्टीने तत्काळ रस्त्याच्या कामांची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बैठक घेऊन बांधकाम विभागाला दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्यांची पाहणी केली.

लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे सारडा कॉलेज, न्युआर्ट्स कॉलेज, रेसिडेन्शियल हायस्कूल, फिरोदिया हायस्कूल, केडगाव येथील अंबिका विद्यालय आदी भागात सुरु असलेल्या व सुरू होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा आयुक्त यशवंत डांगे यांनी घेतला. पत्रकार चौकापासून ते दिल्लीगेट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावर सारडा, न्यू आर्टस्, रेसिडेन्शियल कॉलेज आहेत. लालटाकी येथे शाळा आहे. तसेच, वाडिया पार्क संकुलासमोर फिरोदिया संस्थेच्या तीन शाळा व इतर शाळा आहेत. तेथील कामांना गती देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. काम तत्काळ पूर्ण होणार नसले, तरी परीक्षा काळात शाळेत अथवा महाविद्यालयात येण्याजाण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अडचणी येणार नाहीत, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. बांधकाम विभागासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी व शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित असलेली कामे करून घ्यावीत, अशा सूचना आयुक्त यशवंत डांगे यांनी दिल्या.

शहरासह केडगाव येथे अंबिका विद्यालय परिसरात रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्या ठिकाणीही समक्ष पाहणी करून शाळेत जाण्यासाठी अडथळे होणार नाहीत, यादृष्टीने नियोजन करून काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. आयुक्त यशवंत डांगे यांनी सूचना देताच बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ समक्ष पाहणी केली व ठेकेदार प्रतिनिधींना सूचना दिल्या. दरम्यान, रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी महानगरपालिका उपाययोजना करत असली तरी काही अडचणी येऊ शकतात. अशावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी, महानगरपालिकेकडून सर्व सहकारी केले जाईल, असे आवाहनही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार? सखोल चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई होईल का?

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार? अहिल्यानगर...

अहिल्यानगर जिल्हापरिषदेचा अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला..!

यशस्वी सापळा कारवाई ▶️ युनिट - अहिल्यानगर. ▶️ तक्रारदार- पुरुष,वय-60 वर्षे ▶️ आरोपी - अशोक मनोहर शिंदे,...

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय…! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का ‘ॲक्शन’?

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय...! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का 'ॲक्शन'? महासत्ता भारत / अहिल्यानगर गोरगरिबांच्या...