लेटेस्ट न्यूज़पदासाठी पदवीधर शिक्षकाला तिसरे अपत्य झाले नकोसे! निवडणूक लढवताना तिसऱ्या...

पदासाठी पदवीधर शिक्षकाला तिसरे अपत्य झाले नकोसे! निवडणूक लढवताना तिसऱ्या अपत्याची माहिती दडवली.., अपात्रतेच्या कारवाईऐवजी जिल्हा उपनिबंधकांकडून पाठराखण.!

spot_img

पालघरः (योगेश चांदेकर) राज्याच्या सहकार कायद्यानुसार एक सप्टेंबर 2002 नंतर एखाद्या व्यक्तीला तिसरे अपत्य असेल, तर कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालकपदी राहता येत नाही. निवडणूकही लढवता येत नाही; परंतु हा नियम धाब्यावर बसवून ठाणे/पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीवर डहाणू तालुक्यातून एक पदवीधर शिक्षक संचालक म्हणून निवडून आला आहे. तीन अपत्ये असूनही त्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची ठाण्याचे जिल्हा उपनिबंधक दखल घेत नसल्याने शिक्षकांनी आता थेट विभागीय सहनिबंधकाचे दार ठोठावले आहे.

सरकारी कर्मचारी, निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार तसेच सहकारी संस्थांच्या संचालकपदाची निवडणूक लढवणाऱ्यांसाठी तीन अपत्यांबाबत तीन वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार सहकारी संस्थेचे संचालक व्हायचे असेल, तर 1 सप्टेंबर 2002 नंतर संबंधितांना तिसरे अपत्य नसले पाहिजे.

अपात्र असताना दोनदा संचालक – ठाणे/पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीवर डहाणू तालुक्यातून एक शिक्षक संचालक म्हणून एकदा नव्हे, तर दोनदा निवडून गेला आहे. या शिक्षकाला तीन अपत्ये असून त्यापैकी तिसऱ्या अपत्याचा जन्म 2004 मध्ये झाला आहे. सहकारी संस्थेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधिताला तिसरे अपत्य नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागते. या प्रतिज्ञापत्रात तीन अपत्य नसल्याचे लिहून द्यावे लागते.

तिसऱ्या अपत्याची माहिती दडवली – डहाणू तालुक्यातील या पदवीधर शिक्षकाने ठाणे/पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक दोनदा लढवून ती जिंकली आहे. या दोन्ही वेळा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना तिसऱ्या अपत्त्याची माहिती दडवली. हा सहकार कायद्याचा भंग आहे.

नोकरीवरही गडांतर – सहकार कायद्याचा तिसरा अपत्याबाबतचा नियम अतिशय कडक असून 2004 नंतर आपत्य असेल आणि तरीही त्याने ही माहिती दडवून संचालक पद भोगले असेल तसेच त्याने त्या काळात घेतलेले सहकारी संस्थेचे मानधन घेतले असल्यामुळे याप्रकरणी चौकशी होऊन कारवाई झाली, तर त्याच्या नोकरीवर गडांतर येऊ शकते. डहाणू तालुक्यात नोकरीला असलेला हा पदवीधर शिक्षक पतपेढीच्या सर्वसाधारण सभांसाठी उपस्थित असताना त्याने त्याच्या कार्यरत शाळेवर किरकोळ रजा घेतल्या होता, का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे

जिल्हा उपनिबंधकांच्या कामाबाबत नाराजी – याबाबत काही शिक्षकांनी ठाणे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली. ठाणे जिल्हा उपनिबंधक या पदवीधर शिक्षकाला का पाठीशी घालतात, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ठाणे जिल्हा उपनिबंधक शिक्षकांच्या तक्रारीला जुमानत नसल्याने आता काही शिक्षकांनी थेट कोकण विभागाच्या विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागितली आहे. सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक या प्रकरणी आता काय कारवाई करतात, याकडे ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...