आज (दि. २५) सकाळी दहाच्या सुमारास अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या नगर तालुक्यात असलेल्या पिंपळगाव लांडगा गावात एक अप्रिय घटना घडलीय. एका इसमानं त्याची पत्नी आणि दोन मुलींच्या अंगावर दहा लिटर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं. हे अमानुष कृत्य करणाऱ्या इसमाला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुनील गोरख लांडगे असे त्याचं नाव आहे. या संदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.
दरम्यान, सुनील लांडगे यानं पेटवून दिल्यामुळे त्याची पत्नी लिलाबाई, साक्षी आणि खुशी या दोन मुली आगीत प्रचंड होरपळल्यानं मरण पावल्या आहेत. सुनील लांडगे यानं हे अमानुष कृत्य का केलं, याचा शोध नगर तालुका पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.