लोकसभा निवडणुकीतल्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज (दि. १३) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री करताना नगरमध्ये एकाला पकडलं. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजपनं पैशांचा पाऊस पाडला, अशा बातम्यादेखील प्रसारित करण्यात आल्या.
या सर्व परिस्थितीवर महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले ‘हा व्हिडिओ अर्धवट आहे. गाडीत पैसे नव्हते तर गाडीच्या बाहेर पैसे होते. त्यामुळे हे पैसे तिथे कोणी टाकले, हे उघड आहे. हा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून गोंधळाचं वातावरण तयार करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार डॉक्टर सुजय विखे म्हणाले, ‘2019 रोजी बारामती ॲग्रोच्या कामगारांना पैसे वाटप करताना पकडलं होतं. त्यामुळे दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतः काय केलं, हे आधी पहावं.
ते पैसे नक्की कोणाचे?
काल परवा व्हायरल झालेल्या व्हिडिओत पैसे पडल्याचं दिसत आहे. रात्रीच्या वेळी एक गाडी थांबलेली आहे. त्या गाडी बाहेर पाचशे रुपयांचे बंडल पडले आहेत. काही लोक वाद विवाद करत आहेत. असं ते दृश्य असून ते पैसे नक्की कोणाचे हा प्रश्न मात्र अध्यापही अनुत्तरितच आहे.