{अविनाश देशमुख शेवगांव} 9960051755
शेवगाव शेअर मार्केटच्या एका बिग बुलमध्ये आर्थिक गुंतवणुकीचं काम करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातल्या खरवंडी कासार इथे राहणाऱ्या एका तरुणाच्या कानाला गावठी कट्टा लावून 60 लाख रुपयांची खंडणी मागून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नंतर पंधरा लाखांवर त्या तरुणाची प्राण वाचले. पाथर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात इसमांविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगावच्या शेअर्स मार्केटचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याची घटना तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात घडली असून या घटनेत फसवल्या गेलेल्या तरुणाचं नाव अनिरुद्ध मुकुंद धस (वय 30 रा. एरंडगाव ता शेवगाव) असं आहे. या संदर्भात धस यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात धस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी रविवारी शेवगाव येथून पुणे येथे आपला मित्र वैष्णव शिंदे याच्यासोबत चार चाकी वाहनाने जात असताना तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना ते तिसगावच्या दरम्यान एका हॉटेलसमोर माझ्या फॉर्च्युनर कंपनीच्या गाडीला मागून आलेल्या एका विना नंबरची एक स्विप्ट गाडी आडवी आली. त्यात असलेल्या अज्ञात आरोपींनी आमच्या गाडीला कट का मारला असे म्हणत { खोटी बतावणी करून } आम्हाला मारहाण करत त्यांच्या गाडीत जबरदस्तीने बसवलं.
तु शेअर मार्केटचे काम करतो, तु आम्हाला साठ लाख रुपये दे, नाही तर तुला दोरीने बांधुन विहीरीत टाकुन जीवे मारुन टाकू, अशी धमकी देत आमच्या डोक्याला पिस्तूल {गावठी कट्टा } लावले. मी एवढे पैसे नाहीत, असे म्हणताच त्यांनी पंधरा लाख रुपयांची मागणी केली. या घटनेने घाबरून मी माझा मित्र असलेला ओम वाळके याला फोन करून तू पंधरा लाख रुपये घेऊन तिसगाव रोडवर येण्यास सांगितले.
यानंतर आरोपींनी आम्हाला अनेक ठिकाणी फिरवत शेवटी खरवंडी परिसरात नेले. वाळके व दुसरा मित्र संग्राम काळे हे या परिसरात आले असताना त्या ठिकाणी एका दुचाकीवरून एक जण आला व आरोपींनी त्याच्याकडे पैसे देण्यास फोनवरून सांगितले. ज्या तरुणाकडे पैसे दिले तो तरुण व आमच्या गाडीतील एक जण असे पैसे घेऊन मिडसांगवी च्या दिशेने रवाना झाले तर मला व शिंदे याला आरोपींनी संध्याकाळी सातच्या सुमारास खरवंडी येथे असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ सोडून दिले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
17 तारखेला रविवारी रात्री नऊ ते सव्वा नऊ च्या दरम्यान शेवगाव शहरातील गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पाथर्डी रोड ने येणाऱ्या एका ईर्टिगा गाडीमध्ये मागच्या सीटवर दोघांमध्ये सुंदोपसुंदी चालू होती. त्यातील एकाने गाडीची मागची काच फोडून हेल्प मी, हेल्प मी, मला वाचवा, असा आरडा ओरडा सुरू केला. त्याच गाडीतील इतर लोकांनी उडून आत घेतले. गाडी बसस्थानकाच्या क्रांती चौकाच्या दिशेने पैठण रोडला निघून गेली. सदर घटना परिसरातील काही लोकांनी पाहिली. परंतू शेवगावची एकूण सध्याची परिस्थिती पाहता आपण या भानगडीत पडायला नको. नसती पोलिसांची झंझट आपल्यामागे नको म्हणून पुढे येऊन माहिती द्यायला कोणी तयार नाही. शेवगाव शहरात शेअर मार्केट बुडालेल्या निधी अर्बन लिमिटेड यामुळे तर हे हिंसक वातावरण तयार झाले नाही ना, अशी दबक्या आवाजात शेवगाव शहरासह तालुक्यात चर्चा सुरु आहे.
पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याची खबर पाथर्डी तालुक्यातील काही गुन्हेगार मंडळींना ताबडतोब मिळाली. म्हणजे गंगाधर हाच शक्तिमान नाही ना, अशी चर्चा सर्वसामान्य पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील नागरिकांमधून केली जात.
आरोपींचा शोध सुरु…!
या संदर्भात पाथर्डीचे पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, की या प्रकरणात फिर्यादीने पाच अनोळखी आरोपींचा सहभाग असल्याची माहिती दिली आहे. त्या दृष्टीने आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरु आहे. आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. लवकरच आम्ही आरोपींना अटक करु.