राजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय रथ अडविणाऱ्यांना आडवं करु : केंद्रीय मंत्री रामदास...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय रथ अडविणाऱ्यांना आडवं करु : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य

spot_img

‘मला नको तुमचे हार बुके, नगरमधून मला खासदार पाहिजे फक्त सुजय विखे’, या शिघ्र कवितेनं भाषणाला सुरुवात करुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नगरमध्ये काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक अनेक वर्षे देशाच्या सत्तेत राहिले. मात्र त्यांना कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यावासा वाटला नाही. काँग्रेसने मुस्लिमांच्या मतांचा फक्त वापर करून घेतला आणि मुस्लिमांना वाऱ्यावर सोडलं. मात्र या देशामध्ये सर्व पक्षीय आशिर्वादाच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय रथ धावत आहे. हा रथ अडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्याला आडवं करणार, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. 

नगर दक्षिणेतले महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर शहरातल्या मंगलगेट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सचिन जाधव, सुनील साळवे, माजी नगरसेवक अजय साळवे आदीसह शिवसेना भाजप आणि आरबीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांची भाषणं झाली. या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री आठवले काय म्हणाले, हे तुम्हीच पहा आणि ऐका.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...