गुन्हेगारीनेवासे तालुक्यात काळा दिवस ...! बायोगॅसच्या खड्ड्यात सहा जण पडले ; एकाचा...

नेवासे तालुक्यात काळा दिवस …! बायोगॅसच्या खड्ड्यात सहा जण पडले ; एकाचा मृतदेह आढळला ; शोधकार्य सुरु ; संपूर्ण नेवासे तालुका हादरला…!

spot_img

आज हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा. मात्र नगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यासाठी हा काळा दिवस ठरलाय. नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या  वाकडी इथं एका शेतकऱ्यानं  बायोगॅससाठी खोदलेल्या खड्ड्यात शेणाची स्लरी तयार करण्यात आली होती. या खड्ड्यात एक मांजर पडलं म्हणून एक मुलगा काढण्यास गेला असता तो बुडाला. त्या मुलाला काढण्याकरता दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे सहा लोक उतरले होते. ते देखील बुडाले.

दरम्यान, एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून इतरांचे मृतदेह काढण्याचं शोध कार्य सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव सहकारी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. बायोगॅसमध्ये बुडालेल्या व्यक्तींमध्ये माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड यांचा समावेश आहे.

या संदर्भात प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितलं, की नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या वाकडी येथील एका शेतकऱ्याच्या बंद विहिरीमध्ये जनावरांचे मलमूत्र टाकले होते. त्या विहिरीतील मल मुत्राच्या स्लरीचा गॅस तयार झाला. सदर विहिरीत एक मांजर पडलं. म्हणून एक मुलगा काढण्यास गेला असता तो बुडाला.  त्या मुलाला काढण्याकरता दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे सहा लोक उतरले होते तेदेखील बुडाल्याची माहिती मिळाली.

या खड्ड्यात बुडालेल्या व्यक्तींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे आणि नगरला हलविण्याची तयारी सुरु आहे. विहिरीत पडलेला विशाल अनिल काळे यास बाहेर काढले असून तो मृतावस्थेत आढळून आला. रेस्क्यू टीमसह अहमदनगर महानगरपालिकेचे दोन मोठे सक्षन पंप घटनास्थळी पोहोचले आहेत. ईनक्वेस्टसाठी ६ टीम तयार ठेवण्यात आल्या होत्या.

या खड्ड्यात पडलेला विशाल अनिल काळे यास बाहेर काढलं. मात्र तो मृतावस्थेत मिळून आला. आएम एस ई बी पावर कंटिन्यूशनसाठी त्यांच्याशी बोलणी केलेली आहे. मृतदेह नेण्याकरता रुग्णवाहिका असे ठेवण्यात आल्या होत्या तसेच मृतदेहांच्या पोस्टमार्टमसाठी डॉक्टरांची टीम तयार ठेवण्यात आली होती.

गर्दीमुळे ट्रॅफिक जाम होणार नाही, यासाठी रोड बंदोबस्त आणि घटनास्थळी बंदोबस्त लावला होता. घटनास्थळाच्या परिसरात कायदा व सु-व्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे,  उपविभागी पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव, प्रांत पाटील, तहसीलदार बिरादार बिडिओ नेवासा यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी हजर असून समन्वयाने काम करीत आहेत. विहिरीत पडलेले मृतदेह यांना बाज, खाट, रस्या यांच्या साह्याने बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरु होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...