श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जात असलेल्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांचं ठिकठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केलं जात आहे. नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विविध देवस्थानच्या दिंड्यांचं पंढरपूरकडे मार्गक्रमण होत आहे. त्यामुळे या परिसरातलं वातावरण भक्तिमय बनलं आहे.
नेवासे तालुक्यातल्या संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थांच्या दिंडीचं पांढरीपूल परिसरात असलेल्या हॉटेल लिलियम उद्योग समुहाच्यावतीनं भक्तिमय असं स्वागत करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर मंदीर संस्थानचे अध्यक्ष हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. हॉटेल लिलियम पार्क उद्योग समुहाचे संस्थापक सुरेश शेटे पाटील आणि शेटे पाटील परिवाराच्यावतीनं यावेळी संत पूजन करण्यात आलं.
दरम्यान, मोबाईलच्या गैरवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर ह भ प म्हस्के महाराज यांनी सविस्तर असे विचार ‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केले.