नगर – संपूर्ण राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दि ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.
आज नगरमधील नेप्ती नाका येथे सदस्य नोंदणीचा प्रारंभ शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख विलास घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, प्रथम महापौर भगवान फुलसौन्दर, आयोजक माजी नगरसेवक संजय शेडगे, जेष्ठ नेते अर्जुनराव दातरंगे, विधानसभा समन्वयक दत्ता जाधव, शाम नळकांडे, सचिन शिंदे व संदीप दातरंगे, बाळासाहेब बोराटे, गणेश पिस्का, सुशांत शिंदे, रामा गुंडू, दिनकर आघाव, कैलास शिंदे, प्रणव भोसले, हर्षल शिंदे, प्रताप गडाख, योगीराज गाडे, मुन्ना भिगारदीवे, अरुण झेंडे, श्रीकांत चेमटे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मोठ्या संख्नेने सदस्य नोंदणी झाली,पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत चांगले यश संपादन केले आहे.त्यामुळे सदस्य होण्याकडे लोकांचा कल वाढला आहे सदस्य झालेल्याना लगेच ओळखपत्र दिले गेले ,या भगवा सप्ताह मध्ये सहभागी होऊन शिवसेनेचे सक्रिय सदस्य व्हावे असे आवाहन शिवसेना नगर च्या वतीने करण्यात आले आहे