राजकारणनीलेश सांबरे यांना काँग्रेसमधून भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता.. पालघरमधील सांबरे यांच्या ताकदीमुळे...

नीलेश सांबरे यांना काँग्रेसमधून भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता.. पालघरमधील सांबरे यांच्या ताकदीमुळे खा. गावित यांना धास्ती., जिजाऊ संघटनेकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली..!

spot_img

पालघरः पालघर जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेले नीलेश सांबरे यांनी भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केले आहे.भिवंडीतून ते स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असून पालघर लोकसभा मतदारसंघात ते प्रबळ उमेदवार देणार असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. खा. राजेंद्र गावित यांच्याविरोधातील त्यांच्या वक्तव्याने तर त्यांची दिशा स्पष्ट झाली असून, खा. गावित यांची धास्ती वाढली आहे.

कोकणातील सात लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिजाऊ संघटनेच्या मार्फत लढवण्याचे सांबरे यांनी जाहीर केले आहे. सांबरे यांची पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यांशी खास जवळीक होती; परंतु नंतर त्यांच्याच गटाच्या आमदाराने सांबरे यांची कोंडी केल्याने आता त्यांनी स्वबळावर सामाजिक संघटनेचे एवढे मोठे काम उभे केले आहे, की अन्य पक्षांना त्यांची दखल घ्यावी लागत आहे. त्यांच्यावर आरोप होत असले, तरी त्याची फार दखल न घेता त्यांचे काम आणि जनसंपर्क सुरू आहे.

राहुल गांधी यांच्या स्वागताने अनुकूल
सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. सांबरे यांना गृहीत धरणे धोक्याचे ठरू शकते, असे सर्वच राजकीय पक्षांना वाटते. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अजून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पेच आहे. सांबरे स्वतः काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्यास तयार आहेत. राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चे सांबरे यांनी ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे; परंतु काँग्रेसची उमेदवारी नाही मिळाली, तरी निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.

कपिल पाटील यांच्याविरोधात लढण्यावर ठाम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी सांबरे यांचे चांगले संबंध आहेत; परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याशी त्यांचे विळा-भोपळ्याचे नाते आहे. गेल्या दहा वर्षात कपिल पाटील काहीही विकासकामे केली नाहीत. सगळ्या प्रश्नांना पाने पुसण्याची कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडालेला आहे. फक्त पक्ष आणि चिन्ह याकडे पाहून लोक आता मतदान करणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे. जनतेला जनतेमध्ये जाऊन काम करणारे, जनतेचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व हवे आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जनसेवेचे प्रचंड काम उभे करणारे जिजाऊ संघटनेचे सांबरे हेच यावेळी खासदार होतील, असे त्यांचे समर्थक सांगतात.

सामाजिक कामाचा दबदबा
राजकीय कोंडी केली जात असल्याने आता त्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच निवडणूक लढवण्याचा निर्णय सांबरे यांनी घेतला आहे. विक्रमगड नगरपालिकेवर त्यांनी दोनदा सत्ता मिळवली होती. सामान्य जनतेचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोकण विभागातील गरिबीची जाणीव असल्याने त्यांनी विक्रमगड, वाडा, जव्हार, ठाणे, रत्नागिरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळावी, म्हणून करिअर मार्गदर्शन शिबिर स्पर्धा परीक्षा मोफत कोचिंग क्लासेस आदी उपक्रम राबवले आहेत. ठाणे, विक्रमगड, जव्हार, वाडा, भिवंडी, पालघर आदी भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी अशा उच्च शिक्षणाची दारे खुली करून देऊन विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आहे. अनेक विकासकामे त्यांनी पाठपुरावा करून सुरू केली.

गावित हेच लक्ष्य
गेल्या पंधरा वर्षापासून जिजाऊ संघटना सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. पालघर जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्याचे काम ही संघटना करीत आहे. पालघर येथील झालेल्या मेळाव्यात त्यांनी खासदार राजेंद्र गावित यांचा नामोल्लेख टाळून पक्षबदलूंना घरी बसवण्याचा संकल्प सोडला आहे. गावित यांना निवडून आणण्यात आपलाच वाटा असल्याचे सांगत त्यांनी आता प्रस्थापित आणि स्वतःचे फायदे घेणाऱ्या राजकारणांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.

पालघरमधून मातब्बर इच्छुक
आम्ही जेव्हा राजकारणात उतरतो, तेव्हा पूर्ण तयारीनिशी उतरतो. त्यामुळे आताही पालघरसह सात लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे सांगत त्यांनी पालघरवर विशेष लक्ष असल्याचे आवर्जून नमूद केले. पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आता त्यांच्याशी संपर्क सुरू केला आहे भाजपचे दिवंगत आमदार पास्कल धनारे यांच्या पत्नी मीना धनारे यांनी स्वतःच आपल्याशी जिजाऊ संघटनेने संपर्क साधण्याचे सांगितले.

गावितांनी भूमिपुत्रांना सोडले वाऱ्यावर
पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये जिजाऊ संघटनेचा पाठींबा हा स्थानिक नेतृत्वाला राहील. दोन टर्म खासदार, आमदार मंत्री राहिलेल्या गावितांनी जनहिताचे कुठलेही प्रश्न सोडवले नाहीत. येथील भूमिपुत्रांना वाऱ्यावर सोडून बाहेरच्या लोकांना नोकऱ्या आणि व्यवसायात प्राधान्य दिले. केवळ जातीय राजकारण करून व दोन समाजात भांडणे लावून कायम आपली पोळी भाजून घेतली आहे असल्याची टीका सांबरे यांनी केली असून वाढवण बंदराचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. आता जनताही सुज्ञ झाली आहे. जिल्ह्याचा विकास हेच जिजाऊचे धोरण आहे. येत्या निवडणुकीत जिजाऊ संघटनेची निर्णयाक भूमिका असेल आणि जनतेशी बांधिलकी असणारा उमेदवारच जिजाऊ संघटना निवडून आणेल, असे सांबरे यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...