राजकारणनिवडणुकीत निष्ठा न पाळणार्यांना धडा शिकवा....

निवडणुकीत निष्ठा न पाळणार्यांना धडा शिकवा….

spot_img

आंबेगाव : अनेक लोकांनी माझ्यासोबत काम केले आहे. येत्या निवडणुकीत निष्ठा न पाळणाऱ्यांना धडा शिकवावा लागणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगाव तालुक्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी त्यांनी मतदारांना आवाहन करताना जणू दिलीप वळसे पाटील यांना पाडण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले.
पवार म्हणाले, जर हे लोक आम्हा लोकांबरोबर निष्ठा ठेवत नसतील तर उद्या निवडून दिल्यानंतर जनतेशीही निष्ठा ठेवणार नाहीत, एवढंच मला सांगायचे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर तुम्हा सर्वांना जागं राहावे लागेल.
पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू. निष्ठावंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असेही आवाहन शरद पवार यांनी केले
इथून मागच्या सगळ्या निवडणुका आठवा. या जिल्ह्यातले उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक लढले, त्याच्यावर फोटो कुणाचा वापरला. मात्र सर्व सुरळीत सुरू असताना कुणाची धमकी आली. त्यांनी पक्ष सोडून दुसरीकडे प्रवेश केला.
त्यामुळे यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला जागे व्हावे लागणार आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे सर्वात एकनिष्ठ मानले जायचे. शरद पवारांनी त्यांना मानस पुत्र मानले होते.
मात्र ते आपली साथ सोडतील असे शरद पवारांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यांच्या जाण्याचा शरद पवारांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...