लेटेस्ट न्यूज़नाशिकचे नवे आयजी रमले जुन्या आठवणींमध्ये ; 'कोतवाली'तल्या गोल 'घुमटा'ला दिली भेट...

नाशिकचे नवे आयजी रमले जुन्या आठवणींमध्ये ; ‘कोतवाली’तल्या गोल ‘घुमटा’ला दिली भेट …!

spot_img

नाशिक परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल (दि.21) अहमदनगरला येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांचं स्वागत केलं. आगामी लोकसभा निवडणुकीसह शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी काही मौलिक सूचना केल्या. त्यानंतर दुपारी नगरच्या पत्रकारांशी चर्चा केली.

सायंकाळी पाचनंतर आयजी कराळे यांनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यांचं स्वागत केलं. कोतवाली पोलीस ठाण्याची नवीन प्रशस्त इमारत पाहून आयजी कराळे यांनी समाधान व्यक्त केलं. एसपी ओला यांनी त्यांना माहिती दिली.

त्यानंतर आयजी कराळे यांनी 25 वर्षांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्याचा कारभार ज्या गोल घुमटाकार आणि ऐतिहासिक इमारतीमध्ये चालत होता, त्या इमारतीला भेट दिली. त्या गोल घुमटाकार इमारतीत गेल्यानंतर आयजी कराळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. एसपी ओला यांना त्यांनी सांगितलं, अमूक ठिकाणी पोलीस निरीक्षकाची केबिन होती. अमूक ठिकाणी ठाणे अंमलदार बसत होते.

तत्कालीन एसपी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यावेळी केलेल्या काही कामांची माहिती देणारा फलकही त्याठिकाणी होता. तो पाहून आयजी कराळे यांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोतवाली पोलीस ठाण्यातल्या या घुमटाकार इमारतीसह अन्य परिसरात हल्ली काहीशी अस्वच्छता पसरली आहे. नव्या इमारतीमुळे या परिसराकडे दुर्लक्ष होत आहे. हा परिसर पुन्हा एकदा उजळून निघावा, अशी अपेक्षा मात्र आयजी कराळे यांच्या दौऱ्यांनंतर उपस्थितांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...