नागापूरवाडी ता.पारनेर येथे वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरूध्द गुन्हे शाखेची कारवाई…
2 आरोपीकडून 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव व बाळासाहेब गुंजाळ अशांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 16/12/2024 रोजी पथक पारनेर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन टाटा कंपनीचे 1618 ढंपरमधुन अवैध वाळुची नागापूरवाडी ते पळशी रोडने वाहतुक करणार आहेत. पथकातील पोलीस अंमलदारांनी तात्काळ नागापूरवाडी येथे जाऊन सापळा रचुन बातमीतील दोन पांढरे रंगाचे टाटा कंपनीचे ढंपर मिळून आल्याने, दोन्ही ढंपर थांबवून चालकास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) ज्ञानदेव भिमाजी रक्टे, वय 31, रा.कासारी, ता.पारनेर व 2) अंकुश पोपट केदार, वय 32, रा.पळशी, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.नमूद दोन्ही ढंपरच्या पाठीमागील हौदामध्ये वाळू मिळून आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे वाळु वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याने पंचासमक्ष 40,00,000/- रूपये किंमतीचे दोन टाटा कंपनीचा ढंपर 1618 मॉडेल क्रमांक एमएच-22-एएन-7171 व एमएच-11-एएल-6280, 80,000/- रू किं.8 ब्रास वाळु दोन्ही ढंपरमध्ये प्रत्येकी 4 ब्रास वाळु असा एकुण 40,80,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील 02 आरोपीविरूध्द पारनेर पोलीस स्टेशन गुरनं 882/2024 बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.