लेटेस्ट न्यूज़नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा...

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

spot_img

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान

स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन

अहमदनगर – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंतीदिन स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या वतीने १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता मोहीम, जनजागृतीपर कार्यक्रम,शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता, निबंध, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धा, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, वृक्षारोपण, सायकल स्पर्धा, प्लॉगीथॉन, सफाई कामगारांचस सन्मान अशा विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.

१८ सप्टेंबर रोजी या अभियानाचे उद्घाटन न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. दुनियादारी फेम अभिनेत्री उर्मिला कानेटकर, आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा मराठा प्रसारक संस्थेचे विश्वस्त रामचंद्र दरे,ॲड.विश्वास आठरे, न्यू आर्टस् कॉमर्स ऄँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब सागडे व रेसिडेन्सीअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.यावेळी स्वच्छतेवरील जींगल चे अनावरण होणार आहे कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी स्वच्छ्ता जनजगृतीपर पथनाट्य व ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमात शहरातील नागरिक, शाळा, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महानगरपालिका कर्मचारी सहभागी होणार आहेत.

दररोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता या अभियानात केली जाणार आहे. तसेच, स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सायकल स्पर्धा, प्लॉगीथॉन असे उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. वेस्ट टू आर्ट अंतर्गत महालक्ष्मी उद्यानात उपक्रम राबवून टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती केली जाणार आहे.

विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता, निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिली ते चौथी (छोटा गट), पाचवी ते आठवी (मध्यम गट), नववी – दहावी (मोठा गट) अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत. यात प्रथम क्रमांक ३००० रुपये, द्वितीय क्रमांक २५०० रुपये, तृतीय क्रमांक १५०० रुपये व उत्तेजनार्थ १००० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी महात्मा गांधी पुतळा वाडिया पार्क येथे पुष्पहार अर्पण करून नगर महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात अभियानाची सांगता होणार आहे. यात विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व सफाई कामगारांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. शहरातील सर्व नगरकर, सामाजिक संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे तसेच अभियानाबाबत नागरिकांच्या काही सूचना किंवा संकल्पना असतील तर या बाबत मा.आयुक्त यांच्याशी कार्यालयात भेट घेऊन संवाद साधावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे

 स्वच्‍छता मोहीम दि.१९ सप्टेंबर
ठिकाण:- विशाल गणपती मंदिर परिसर
सहभागी:- विश्वस्त मंडळ, श्रीकांत प्रेमराज गुगळे माध्यमिक विद्यालय,CSRD विद्यार्थी मनपा प्र.स.क.२ चे कर्मचारी

 स्वच्‍छता मोहीम दि.२० सप्टेंबर
ठिकाण:- पुणे बस स्‍थानक परिसर
सहभागी:- राजयोग प्रतिष्‍ठान, नागरीक, भाऊसाहेब फिरोदिया माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, केडगाव उपकार्यालय सर्व मनपा कर्मचारी

 RRR Center भेट दि.२० सप्टेंबर
ठिकाण:- मेंटॉर्स फाउंडेशन
सहभागी:- मेंटॉर्स फाउंडेशन सदस्य

 स्वच्‍छता मोहीम दि.२१ सप्टेंबर
ठिकाण:- माळीवाडा बस स्‍थानक परिसर
सहभागी:- महिला बचत गट, सिताराम सारडा माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, मनपा कर्मचारी लेखा विभाग, लेखापरिक्षण विभाग

 स्वच्‍छता मोहीम दि.२२ सप्टेंबर
ठिकाण:- अमरधाम परिसर व बाळजी बुवा बारव
सहभागी:- धर्मवीर प्रतिष्‍ठाण,श्री.गणेश कवडे,श्री.अजय चितळे, महिला बचत गट, केशवराव गाडीलकर माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, मनपा कर्मचारी बांधकाम विभाग,पाणीपुरवठा विभाग

सायकल स्‍पर्धा दि.२२ सप्टेंबर
ठिकाण:- सावेडी उपनगर
सहभागी:- अहमदनगर सायकल असोसिएशन

 स्वच्‍छता मोहीम दि.२३ सप्टेंबर
ठिकाण:- भिस्‍तबाग महाल परिसर
सहभागी:- आठरे पाटील पब्‍लीक स्‍कुल व ज्ञानसंपदा शाळा, डॉ.ना.ज.पाऊलबुध्‍दे माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, श्री.संपत बारस्‍कर मा.नगरसेवक, बचत गट, मनपा कर्मचारी प्र.स.का.१

 स्वच्‍छता मोहीम दि.२४ सप्टेंबर
ठिकाण:- तारकपुर बस स्‍थानक परिसर
सहभागी:- रेणावीकर माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, महिला बचत गट, मनपा कर्मचारी आस्‍थापना विभाग, सामान्‍य प्रशासन विभाग

 स्वच्‍छता मोहीम दि.२५ सप्टेंबर
ठिकाण:- रेल्‍वे स्‍थानक परिसर
सहभागी:- महाराणी ताराबाई कन्‍या विदयालयाचे विदयार्थी सी.एस.आर.डी. महाविदयालयाचे विदयार्भी, महिला बचत गट, मनपा कर्मचारी प्रभाग समिती कार्यालय क्र.४

 स्वच्‍छता मोहीम दि.२६ सप्टेंबर
ठिकाण:- आनंद धाम परिसर
सहभागी:- श्री.गणेश भोसले, सौ.शितलताई जगताप, सौ.मिनाताई चोपडा, श्री.प्रकाश भागानगरे (नगरसेवक) जिजामाता माध्‍यमिक विदयालय CSRD महाविदयालयाचे विदयार्थी महिला बचत गट,मनपा कर्मचारी घनकचरा व मोटर वेहिकल विभाग

 स्वच्‍छता संवाद दि.२६ सप्टेंबर
ठिकाण:- प्रोफेसर चौक
सहभागी:- मैत्री कट्टा श्री.संजय दळवी

 स्वच्‍छता मोहीम दि.२७ सप्टेंबर
ठिकाण:- गंगा उदयान
सहभागी:- श्री.अजिंक्‍य बोरकर, महिला बचत गट, आनंद माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, समर्थ विदयालयाचे विदयार्थी, मनपा कर्मचारी उदयान व प्रसिध्दी विभाग सर्व कर्मचारी

 स्वच्‍छता मोहीम दि.२८ सप्टेंबर
ठिकाण:- कापडबाजार परिसर
सहभागी:- श्री.संजय चोपडा, अश्विन गांधी व व्‍यापारी वर्ग, भाग्‍योदय माध्‍यमिक विदयालय, महिला बचत गट, मनपा कर्मचारी अतिक्रमण,विद्युत, प्रकल्प विभागाचे सर्व कर्मचारी

 स्वच्‍छता मोहीम दि.२९ सप्टेंबर
ठिकाण:- वस्‍तु संग्रहालय ते भारतीय स्‍टेट बँक चौक
सहभागी:- महिला बचत गट, जगदंबा माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी मनपा कर्मचारी प्रभाग समिती कार्यालय क्र.३

 प्‍लॉगीथॉन दि.२९ सप्टेंबर
ठिकाण:- प्रोफेसर चौक
सहभागी:- अहमदनगर रनर्स ग्रुप

 स्वच्‍छता मोहीम दि.३० सप्टेंबर
ठिकाण:- बागरोजा परिसर
सहभागी:- सौ.रोहिणीताई शेंडगे, महिला बचत गट, यशवंत माध्‍य‍मिक विदयालयाचे विदयार्थी, मनपा कर्मचारी नगर रचना विभाग सर्व कर्मचारी

 सफाई मित्र सुरक्षा शिबिर दि.३० सप्टेंबर
ठिकाण:- प्रभाग समिती कार्यालय क्र.१ व २ सफाई कर्मचारी
सहभागी:- वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी

 शौचालय स्‍वच्‍छता दि.०१ ऑक्‍टोबर
ठिकाण:- सार्वजनिक व सामुदायिक शौचालय
सहभागी:- सर्व मुख्‍य स्‍वच्‍छता निरीक्षक, सर्व स्‍वच्‍छता निरीक्षक

 सफाई मित्र सुरक्षा शिबिर दि.०१ ऑक्‍टोबर
ठिकाण:- प्रभाग समिती कार्यालय क्र.३ व ४ सफाई कर्मचारी
सहभागी:- वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी

 स्‍वच्‍छता मोहिम दि.०१ ऑक्‍टोबर
ठिकाण:- महालक्ष्‍मी उदयान
सहभागी:- विश्‍वंभरदास नयर माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, श्री.स्‍वामी समर्थ युवा प्रतिष्‍ठाण, श्री.अक्षय भगत मनपा कर्मचारी-उदयान विभाग सर्व कर्मचारी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...