नगरच्या महापालिकेत जो नगर रचना विभाग आहे, त्या विभागाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं काहीही देणं घेणं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नगरसह उपनगरात इमारतंचं बांधकाम करण्यात आलं आहे, त्याचा आराखडा कोणी तयार केला? नगर शहर आणि परिसरातील 41 ओढे – नाले कसे काय गायब झाले? या महापालिकेत नक्की काय चाललंय, असा उद्विग्न सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी ‘महासत्ता भारत’शी बोलताना उपस्थित केलाय. काय म्हणताहेत चंगेडे, हे तुम्हीच ऐका.
चंगेडे पुढे म्हणाले, की शासन निर्णयानुसार वर्तमानपत्रात महापालिकेविषयी आलेल्या बातम्यांचा खुलासा 24 तासांत करणं बंधनकारक आहे. मात्र अद्यापपर्यंत असा कुठलाही खुलासा आमच्या वाचण्यात आलेला नाही. नगर महापालिकेचा कारभार अत्यंत बेजबाबदारपणे सुरु आहे. प्रशासकाला कोणाचाच हस्तक्षेप नसतानाही कामं नियोजनबद्ध होत नाहीत.