गुन्हेगारीनगर महापालिका हद्दीत एकही कत्तलखाना नाही? नाकर्त्या महापालिका अधिकाऱ्यांनो, मग कोतवाली...

नगर महापालिका हद्दीत एकही कत्तलखाना नाही? नाकर्त्या महापालिका अधिकाऱ्यांनो, मग कोतवाली पोलीस ठाण्याची ही कारवाई काय सांगतेय ?

spot_img

नगर शहर आणि परिसरात एकही कत्तलखाना नाही, अशी माहिती देणाऱ्या नगर महापालिकेच्या नाकर्त्या अधिकाऱ्यांचं पितळ आता चांगलंच उघड पडलं आहे. या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारांतर्गत खोटी माहिती दिल्याचं समोर आलं आहे.

यांचं कारण असं आहे, की नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकानं एका वाहनाचा पाठलाग करत बोलेरो पिकअप चालकाससह इतर ३ साथीदारांना अशोका हॉटेलजवळ, झेंडीगेट, अहमदनगर इथं फिल्मी स्टाईलनं ताब्यात घेतलंय.

या पार्श्वभूमीवर नाकर्त्या अधिकाऱ्यांनो, नगर महापालिका हद्दीत एकही कत्तलखाना नाही म्हणता. मग कोतवाली पोलीस ठाण्याची ही कारवाई काय सांगतेय, असा सवाल संतप्त नगरकरांमधून आता उपस्थित केला जात आहे.

कोतवाली ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लाख १२ हजार रुपये किंमतीची गोवंशीय वासरं ताब्यात घेण्यात आली आहेत.

कोतवाली पोलिसांनी केडगाव चौफुला येथे पिकअप चालकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पिकअप चालकानं धूमस्टाईलनं गाडी पळवून नेत असताना कोतवाली पोलिसांच्या पथकानं अशोका हॉटेल येथे फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत काहींना ताब्यात घेतलंय.

केडगांव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पहाटे तीनच्या सुमारास पोनि प्रताप दराडे यांना गुप्तबातमीदारामार्फत मिळाली की, सुप्याकडून नगरच्या दिशेनं एका महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप (एम एच १४ ई एम) गोवंशीय वासरं घेवून जात आहे .

पोलीस निरीक्षक दराडे यांनी गोवंशीय वासरं वाहतूक भरून जाणाऱ्या बोलेरो पिकअपची खात्री करुन कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्यानं कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दिपक रोहोकले, तानाजी राजेंद्र पालवे, सत्यम शिंदे, सुरज कदम व पोहेकॉ खराडे, पोकॉ/ गावडे हे अंबिका हॉटेलजवळ(सोनेवाडी चौक, केडगांव) येथे सदर येण्याची वाट पाहत असताना सदर बोलेरो पिकअप सकाळी ०६/३० वा.च्या सुमारास आला.

या पिकअपवरील चालकास थांबविण्यासाठी हाताचा इशारा केला असता सदर चालकाने पोलीस पथक व पोलीस स्टाफ तसेच पंच यांचा जीव घेण्याचं उद्देशानं अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस पथक जीव वाचविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला झाले. सोबत मदतीसाठी असणारे निरंजन कार्ले यांच्या हातावर सदर पिकअपमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या इसमानं काही तरी धारदार वस्तुनं मारहाण करुन त्यांना जखमी केलं.

वाहन चालक पिकअप भरधाव वेगात अहमदनगरच्या दिशेने घेवून गेला. त्यानंतर कोतवाली पोलिसांच्या पथकानं सदर वाहनचा पाठलाग करुन बोलेरो पिकअच चालकास अशोका हॉटेलजवळ (झेंडीगेट, अहमदनगर) इथं आज (दि. ८) ०७/०० वाजण्याच्या सुमारास पकडून पिकअप रस्त्याच्या बाजुला थांबवून आरोपींना ताब्यात घेतलं.

यामध्ये आलक्या कृष्णा काळे (वय-५० वर्षे), संदीप आलक्या काळे (वय-२४ वर्षे ३), आलेश काळे (वय -२२ वर्षे ४), अशोक आलक्या काळे (वय – २६ वर्षे (चालक) सर्व रा. औसरी खुर्द ता. आंबेगांव) यांचा समावेश आहे.

सदर टेम्पोची पाहणी केली असता महिंद्रा कंपनीचा पिकअप (क्रमांक – एम. एच. १४ ई एम २८४९) असून त्यामध्ये जीवंत गोवंशीय वासरे कत्तल करण्याच्या उददेशानं निर्दयतेनं वाहतूक करताना मिळून आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस कर्मचारी दिपक रोहोकले, राजेंद्र पालवे, तानाजी पवार, सत्यम शिंदे, सुरज कदम व पोहेकॉ खराडे, पोकॉ गावडे यांनी कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...