अँन्टी करप्शननगर महापालिका आयुक्त जावळे आणि स्वीय सहाय्यक देशपांडे यांच्या शोधासाठी पथके रवाना...

नगर महापालिका आयुक्त जावळे आणि स्वीय सहाय्यक देशपांडे यांच्या शोधासाठी पथके रवाना ; शेखर देशपांडेच्या घरी सापडलं एवढं घबाड …!

spot_img

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच त्यांचे स्विय सहायक श्रीधर देशपांडे यांचेवर लाचमागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले असुन त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

महापालिका आयुक्तांचे स्विय सचिव श्रीधर देशपांडे याच्या घराची पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 93,000/- रूपये रोख रक्कम, साडे आठ तोळयांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळुन आली आहेत. सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे मिळुन आली आहेत. तसेच बीड जिल्हयात देखील शेत जमीन खरेदी केल्याचे दिसुन येत आहे.

यातील लोकसेवकांनी बांधकाम परवानगी मिळवुन देण्यासाठी पंचांसमक्ष आठ लाख रूपयांची मागणी केल्याने तोफखाना पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...