नगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात पाटबंधारे विभागानं ‘मार्च एंड’च्या नावाखाली शंभर टक्के वसुली झाल्याची टिमकी वाजवली. मात्र ही वसुली इंडस्ट्रियल ॲक्टनुसार करण्यात आलेली आहे. ॲग्रीकल्चर ॲक्टनुसार करण्यात आलेल्या वसुलीचा यामध्ये कुठेच ताळमेळ बसविण्यात आल्याचं दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर आम्हाला (‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्क) पुन्हा एकदा असं विचारायचं आहे, की नगर पाटबंधारे विभागाच्या सायली पाटील मॅडम, खरं खरं सांगा ना, ‘ॲग्रीकल्चर ॲक्ट’च्या वसुलीची किती आहे आकडेवारी आणि टक्केवारी?
नेवासे तालुक्यातल्या किती पाणी वापर संस्थांनी या विभागाकडे पाणीपट्टी जमा केली आहे? किती पाणी वापर संस्थांकडे थकबाकी आहे? ही थकबाकी कधी वसूल होणार? जर ही वसुली करण्यात आली असेल तर या वसुलीची आकडेवारी आणि टक्केवारी सायली पाटील मॅडम कधी जाहीर करणार? असे अनेक प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केले जात आहेत.
चाऱ्या दुरुस्ती न झाल्याचा हा घ्या पुरावा…!
नेवासे तालुक्यातल्या चाऱ्या आणि पोटचाऱ्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून दरवर्षी मोठा निधी येत असतो. मात्र या निधीची विल्हेवाट पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं लावली आणि खरोखरंच चाऱ्या आणि पोटचाऱ्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत का, अशी जी शंका शेतकरी वर्गातून उपस्थित केली जात आहे, त्या शंकेचं निरसन करणारा हा घ्या पुरावा. पुन्हा एकदा तुम्हीच पहा हा व्हिडिओ.