गुन्हेगारीनगर आरटीओ मॅडम...! कुठं हरवलंय तुमचं भरारी पथक? मरणाऱ्यांच्या नातेवाईकांचा शाप तुम्हाला...

नगर आरटीओ मॅडम…! कुठं हरवलंय तुमचं भरारी पथक? मरणाऱ्यांच्या नातेवाईकांचा शाप तुम्हाला आणि तुमच्या भरारी पथकाला नक्कीच भोगावा लागणार…!

spot_img

आज (दि. १८) नेवासे तालुक्यातली एक ताई तिच्या बाबांसोबत नगरला जात होती. पुढील शिक्षणाची स्वप्नं तिच्या मनात फुलत होती. मात्र तितक्यात डांबराचे ड्रम घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा कंटेनर आला आणि सगळ काही संपलं. या भीषण अपघातात ‘त्या’ ताईचे बाबा तिला आणि तिच्या नातेवाईकांना सोडून गेले. ती ताईसुद्धा जखमी आहे.

या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित झालाय की, नगर आरटीओच्या मॅडम, कुठं हरवलंय तुमचं भरारी पथक?
आतापर्यंतच्या अशा अपघातात ज्यांचा जीव गेला, त्या सर्व मरणाऱ्यांच्या नातेवाईकांचा शाप तुम्हाला आणि तुमच्या भरारी पथकाला नक्कीच भोगावा लागणार आहे, अशी भावना संतप्त नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. (‘महासत्ता भारत’ ‘वंशी रुद्र’ च्या पाकिटमारी चा भांडाफोड करणार…!)

नेवासे तालुक्यातल्या सोनई नजिकच्या खरवंडी या छोट्याशा गावात अनिल दगडू फाटके यांचं कुटुंब आहे. या कुटुंबातल्या मुलीच्या पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सदर मुलगी आणि तिचे वडील नगरकडे जात होते. मात्र समोरुन डांबराचे ड्रम घेऊन भरधाव वेगानं कंटेनर आला आणि फाटके यांच्या दुचाकीला बऱ्याच लांबपर्यंत फरफटत घेऊन गेला.

विशेष म्हणजे या भीषण अपघाताच्या अनेक तासांनंतरही नगर आरटीओचं भरारी पथक अपघातस्थळी आलं नाही. मग या नगर आरटीओच्या भरारी पथकातले अधिकारी नक्की कुठं ‘** मारी’ करत होते, हा तेथे उपस्थित असलेल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. मुळात नगर आरटीओ कार्यालयानं भरारी पथकाची स्थापना केली आहे का, केली असल्यास हे भरारी पथक आज (दि.१८) नक्की कुठं होतं? या भरारी पथकात किती अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं नगर आरटीओच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या ‘मॅडम’ यांनी देणं अपेक्षित आहे.

ओव्हरलोड वाहतुकीकडे नगर आरटीओची सर्रासपणे डोळेझाक…! – नगरमधून चार ते पाच मोठे महामार्ग जात आहेत. यामध्ये नगर – पुणे, नगर – मनमाड, नगर – छत्रपती संभाजीनगर, नगर – जामखेड, नगर -सोलापूर, नगर – कल्याण विशाखापट्टणम आदी महामार्गांचा समावेश आहे. या महामार्गांवरुन ओव्हरलोड वाहतूक सतत सुरु असते. रात्री 10 नंतर तर ओव्हरलोड वाहतूक करणारी ही वाहनं प्रचंड भरधाव वेगानं धावत असतात. अशावेळी दुचाकी चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरुन ये – जा करावी लागते. मात्र या ओव्हरलोड वाहतुकीकडे नगर आरटीओ आणि भरारी पथकाची ‘चिरी मिरी’च्या लालसेतून सर्रासपणे डोळे झाक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...