गुन्हेगारीनगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर ...

नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर …

spot_img

अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ श्री. पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील श्री. शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, बँकेचे तांत्रिक संचालक श्री. शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे. प्रकरणात श्री. शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले..

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...