गुन्हेगारीनगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  फेटाळला

नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  फेटाळला

spot_img

नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  फेटाळला

अहिल्यानगर, दि. 20 (प्रतिनिधी) नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज येथील जिल्हा न्यायाधीश एम. एच. शेख यांनी आज फेटाळून लावला.

नगर अर्बन बँकेत मोठा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी आजी-माजी संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही माजी संचालकांना अटकही झाली आहे, तर काही संचालक फरार आहेत. यातील काही जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेला आहे. तर काहींना जामीन सुद्धा मिळालेला आहे. साधारणता 291 कोटी रुपयांचा हा घोटाळा झाला असून या संदर्भामध्ये तीन ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

यासंदर्भात आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

मूळ फिर्यादी व ठेवीदार यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. बँकेच्या घोटाळे संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी बँकेला लेखी पत्राद्वारे आदेश दिलेले असताना त्याचे पालन झालेले नाही. रिझर्व्ह बँकेने त्यावेळी ४० लाखांचा दंडही केला होता. बँकेच्या ऑडिटमध्ये अनेक बाबी उघड झालेल्या होत्या. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे, ही बाब त्यांनी युक्तिवादामध्ये दाखवून दिली.

मर्दा यांनी जे काही अहवाल बँकेमध्ये सादर केले ते खोटे असून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हा उद्योग केलेला आहे. ही बाब बँकेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे दोन कंपन्यांमध्ये यांची भागीदारी आहे कोट्यावधी रुपयांची उलाढाल या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे मर्दा यांना नेमके किती रुपये मिळाले हे सुद्धा आता पहावे लागणार आहे व त्याचा तपास करावा लागणार आहे असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला व्यंकटेश डेव्हलपर्स व सम्ययक ट्रेडर्स या दोन ठिकाणी मर्दा यांची भागीदारी आहे, हे पुरावांशी सिद्ध झाले आहे. त्यांनी अशाच पद्धतीने खोटे कागदपत्र तयार करून दिल्यामुळे मोठा घोटाळा झालेला आहे. यामध्ये अनेक जण भागीदार आहेत, त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा असा युक्तिवाद पुप्पाल यांनी यावेळी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मर्दा यांच्या अटीपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...