गुन्हेगारीनगर अर्बन बँकेचा माजी संचालक राजेंद्र अग्रवाल हा फक्त कागदोपत्रीच फरार आहे...

नगर अर्बन बँकेचा माजी संचालक राजेंद्र अग्रवाल हा फक्त कागदोपत्रीच फरार आहे का? पोलीस कधी आवळणार अग्रवालच्या मुसक्या?

spot_img

११० वर्षांची परंपरा असलेली बँक म्हणून नगर अर्बन बँकेची ओळख होती. या बँकेऩ अनेकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध केलं होतं. मात्र बोगस कर्ज प्रकरणामुळे दुर्दैवानं ही बँक बंद पडली. ही बँक बंद पाडण्यात सिंहाचा वाटा असलेला माजी संचालक राजेंद्र अग्रवाल गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. मात्र अग्रवाल हा पुण्यातून ई-मेलच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क या कार्यालयाशी संपर्क करत आहे.

अग्रवालचा पुण्यातल्या निवासस्थानाचा पत्तादेखील पोलिसांकडे आहे. तरीदेखील राजेंद्र अग्रवाल हा पोलिसांना सापडत का नाही? अग्रवाल हा केवळ कागदोपत्रीच फरार आहे का? पोलीस कधी आवळणार अग्रवालच्या मुसक्या? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.

नगर अर्बन बँकेत हजारो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून अनेक मुख्य आरोपी फरार आहेत. हे आरोपी कधी सापडणार आणि आमच्या ठेवी आम्हाला कधी मिळणार, या प्रश्नावरुन सभासदांनी ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि चिंता पसरली आहे.

मध्यंतरी नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी उपोषण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीस लोकसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्यानं ठेवीदारांच्या उपोषणाला परवानगी मिळू शकली नाही. दरम्यान, नगर अर्बन बँकेचा फरार संचालक पुण्यात राहत असून पोलिसांना तो कधी सापडणार आणि नगर अर्बन बँकेच्या थकलेल्या ठेवीदारांना न्याय कधी मिळणार, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

नगर अर्बन बँकेच्या राहणार अवघ्या १७ ते १८ शाखा…!

नगर जिल्ह्यात नगर अर्बन बँकेच्या तब्बल 47 शाखा कार्यरत होत्या. यापैकी बहुतांश शाखा या भाड्याच्या जागेत आहेत. हे भाडं देणं परवडत नसल्यामुळे अवसायिकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाडेकरार संपलेल्या इमारती नगर अर्बन बँकेकडून खाली करण्यात येणार आहेत. नेवासे तालुक्यातल्या सोनईत असलेली नगर अर्बन बँकेची शाखा भाड्याच्या जागेत आहे. हा भाडेकरार संपला असल्यामुळे सोनईची नगर अर्बन बँकेची ही शाखा वांबोरी (ता. राहुरी) बँकेच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होणार असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...