राजकारणनगरमध्ये चहापेक्षा किटलीच गरम; आजी-माजी आमदार - खासदार स्वतःचे पर्सनल मोबाईल नंबर...

नगरमध्ये चहापेक्षा किटलीच गरम; आजी-माजी आमदार – खासदार स्वतःचे पर्सनल मोबाईल नंबर जाहीर करतील का?

spot_img

नगरमध्ये चहापेक्षा किटलीच गरम; आजी-माजी आमदार – खासदार स्वतःचे पर्सनल मोबाईल नंबर जाहीर करतील का?

लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांच्यातलं जे नातं असतं ते पारदर्शी असायला हवं. मात्र अनेक लोकप्रतिनिधींचे फोन त्यांची पीए हेच घेत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी नक्की कुठे आहेत, याचा कुठलाही थांग पत्ता सामान्य जनतेला लागत नाही. त्यांचे पी हेएच साहेब कुठे आहेत, ते जनतेशी बोलतील की नाही, ते जनतेला कधी भेटतील किंवा भेटणार की नाहीत, याचा निर्णय अनेक लोकप्रतिनिधींचे पीएच घेताहेत. एक प्रकारे चहापेक्षा किटलीच गरम, अशी परिस्थिती नगरमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे आजी माजी सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वतःचे पर्सनल मोबाईल नंबर जाहीर करावेत, असे आवाहन नगरमधून केलं जात आहे.

सामान्य जनतेला लोकप्रतिनिधीकडे त्यांच्या प्रश्न, समस्या, तक्रारी मांडायचे असतात. मात्र लोकप्रतिनिधींचा संपर्क होत नसल्याने त्यांचे पीए हेच उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. लोकप्रतिनिधी कुठे आहेत, याची खरी माहिती सामान्य जनतेला मिळतच नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेतली दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

मतदारांना मतं मागण्यासाठी निवडणूक लढवू इच्छिणारे संभाव्य उमेदवार निवडणूक काळात जनतेच्या पाया पडतात. मात्र निवडून आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडून देतात. त्यांचा फोनदेखील घेत नाहीत. त्यांचे पीए हेच यासंदर्भात निर्णय घेताहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जर त्यांचे पर्सनल मोबाईल नंबर जाहीर केले तर सामान्य जनतेला लोकप्रतिनिधीशी संपर्क साधणं सोपं होईल आणि जनतेचे सर्व काही प्रश्न मार्गी लागतील. मात्र चहापेक्षा किटलीच गरम असल्यामुळे सामान्य जनतेचा नाविलाज होत आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी हा निर्णय घेतील, का याविषयी मात्र वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...