गुन्हेगारीनगरच्या नेप्तीचा 'फुगा' करतोय सामाजिक कलह ; राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि...

नगरच्या नेप्तीचा ‘फुगा’ करतोय सामाजिक कलह ; राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि नगर तालूका पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष ; ‘पांगरमल’ घटनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहताय का?

spot_img

अहिल्यानगर (अहमदनगर) शहरालगतच्या नेप्ती गावातला ‘फुगा’ म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीतली हातभट्टीची दारु पिऊन ‘तर्राट’ होणाऱ्या ‘तळीरामां’मुळे घरातल्या ‘लक्ष्मी’ला रोजच मारहाण, शिव्या असा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दारुमुळे घराघरांत तर अशांतता पसरतेच आहे. पण नगरच्या नेप्तीचा ‘फुगा’ सामाजिक कलह निर्माण करण्याचं काम मोठ्या इमानेइतबारे करत आहे.

या गंभीर परिस्थितीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि नगर तालूका पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे नगर तालूका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कर्तव्याऐवजी ‘चिरी मिरी’ गोळा करण्यातच धन्यता मानत आहेत. राज उत्पादन शुल्क विभाग आणि नगर तालूका पोलीस काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या ‘पांगरमल’ घटनेच्या पुनरावृत्तीची वाट तर पाहत नाहीत ना, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.

नगर तालुक्यातल्या पांगरमल गावच्या परिसरात विषारी दारु सेवन केल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता. राज्यभरात ही घटना सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, नेप्ती परिसरातली दारुसुध्दा मानवी आरोग्याच्या दृष्टीनं खूप घातक आहे. या दारुमुळे नगर तालुक्यातल्या अनेक घरांमध्ये दररोज भांडणं होत असून यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...