अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे होणारी अंगाची काहिली आणि घामाच्या धारा यापासून ‘रिलिफ’ मिळावा, यासाठी अनेकांची पावलं या जलतरण तलावाकडे आपोआप वळली जात आहेत. मात्र या ठिकाणी पोहायला येणाऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या संदर्भात ‘महासत्ता भारत’नं एक व्हिडिओ खास तुमच्यासाठी केला आहे.
या आर्थिक लुटीची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. आतापर्यंत या ठिकाणी ज्यांची ज्यांची आर्थिक लूट झाली, ते सर्वजण नगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असलेले सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करणार आहेत.
नगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेला हा जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांनी हा जलतरण तलाव सातत्यानं चर्चेत येत असतो. याठिकाणी जे मॅनेजमेंट आहे, ते खासगी आहे. या खाजगी मॅनेजमेंटकडून नगरकरांची आर्थिक लूट थांबविण्यात यावी, अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे.