अँन्टी करप्शननगरकरांनो! निदान आता तरी खडबडून जागं व्हा! कुठपर्यंत भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर उरावर...

नगरकरांनो! निदान आता तरी खडबडून जागं व्हा! कुठपर्यंत भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर उरावर घेणार आहात?

spot_img

अन्याय सहन करणं हा अन्याय करणाऱ्या इतकाच गंभीर गुन्हा आहे, असं म्हटलं जातं. भ्रष्टाचाराच्या बाबतीतदेखील असंच म्हणता येईल. उघड्या डोळ्यांनी आपल्या अवतीभवती होणारा भ्रष्टाचार निमुटपणे पाहत राहणं, हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. नगर महापालिका आयुक्त आणि प्रशासक किंबहूना लाचखोर अधिकारी पंकज जावळे आणि त्याचा पीए शेखर देशपांडे या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल (दि. २७) मोठी दमदार कारवाई केली. अर्थात भ्रष्टाचाराचं कालचं हे प्रकरण म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे.

मात्र या लेखाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कर भरणारे नगरचे व्यापारी आणि तमाम नगरकरांना आम्ही असा जाहीर सवाल विचारु इच्छितो, की कुठपर्यंत तुम्ही भ्रष्टाचाराचा भस्मासूर उरावर घेणार आहात? माफ करा, तुम्हाला न पटणारा कदाचित आमचा हा प्रश्न असू शकतो. पण एक जबाबदार नागरिक म्हणून नगरकरांनी निदान आता तरी  खडबडून जागं व्हायलाच हवंय.

‘त्या’ तक्रारदारांनी हिंमत केली आणि नगरच्या महापालिकेतला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. कालच्या या कारवाईमुळे नगर महापालिकेची अब्रू माळीवाडा आणि दिल्लीगेट वेशीवर टांगली गेलीय. लाचखोर अधिकारी जावळे याचं पोट किती मोठं आहे, याचा प्रत्यय नगरकरांना यापूर्वी वेळोवेळी आलेलाच होता. पण दगडाखाली हात अडकल्यामुळे कुणी काहीच बोलत नव्हतं.

नगरकरांनो, तुमच्या अशा मूकसंमतीमुळेच भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर दिवसेंदिवस चांगलाच पोचला गेला आहे. महापालिकेतलं आपलं काम झालं नाही तरी चालेल. पण लाचखोर अधिकाऱ्यांना घरी पाठवायचंच, असा निर्धार नगरकरांनो, तुम्ही कधी करणार आहात?

प्रामाणिकपणे नगरकर जे संकलित कर भरताहेत, त्यावर यापूर्वी वेळोवेळी डल्ला मारण्यात आलेला आहे. मग तो कचराडेपोतला घोटाळा असू द्या, शहर आणि उपनगरातले 41 ओढे नाले बुजवून त्यावर इमारती बांधण्याचा बक्कळ पैसे घेऊन आराखडा मंजूर करण्याचं प्रकरण असू द्या किंवा अस्तित्वात नसलेल्या लिचेट प्लांटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बिले काढण्याचा विषय असू द्या. हा सारा प्रकार नगरकरांच्या खिशावर दिवसाढवळ्या टाकण्यात आलेला दरोडाच आहे.

खरं तर नगरच्या महापालिकेत लाचखोर अधिकारी जावळे आणि त्याचा पीए शेखर देशपांडे, हे दोघेच भ्रष्टाचारी आहेत असं नाही. तर या महापालिकेतल्या प्रत्येक विभागांत असे भ्रष्टाचारी भस्मासूर पाहायला मिळतील. यापुढे अशा भ्रष्टाचारी भस्मासुरांना चिरडण्याचं पवित्र काम नगरकरांनो, तुम्ही हाती घ्याच, हीच तुम्हाला कळकळीची विनंती.

ज्यांच्या सहीमुळे जावळे आयुक्त झाला, त्यांच्याबद्दल काय बोलणार?

लाचखोर अधिकारी पंकज जावळे याला नगरच्या महापालिकेत आयुक्त म्हणून आणण्यासाठी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हणे शिफारस केली होती. त्यांची शिफारसपत्रं सोशल मीडियावर काल व्हायरलदेखील झाली. पण प्रश्न असा आहे, की या दोघांना तरी काय माहीत होतं, की लाचखोर अधिकारी जावळे याचं पोट खूप मोठ्ठं आहे आणि तो नगरच्या महापालिकेत इतका मोठा भ्रष्टाचार करील? या दोन लोकप्रतिनिधींचा यात मुळात काय दोष आहे? शिफारस करणं, हा जर त्यांचा दोष असेल तर ज्यांच्या सहीनं जावळे याची नगरच्या महापालिकेत आयुक्त या पदावर नियुक्ती झाली, त्यांच्याबद्दल काय बोलणार?

संधीचं सोनं करण्याऐवजी जावळे यानं केली माती…!

लाचखोर अधिकारी पंकज जावळे कसा लालची आणि हावरट होता, आयुक्त होण्यासाठी त्यानं किती कोटी मोजले होते, जावळे हा कोणत्या कामाचे किती पैसे घेत होता, कर्मचाऱ्यांशी जावळे यांची वागणूक कशी होती, याविषयीचे ‘पोवाडे’ अतिशय हळू आवाजात आता नगरमधून ऐकायला मिळत आहेत. जावळे याचे एक एक किस्से आता खासगीत बोलले जात आहेत. जावळे हा तहसीलदार होता. नशिबाने म्हणा किंवा अनेक कोटी रुपये मोजून त्याला नगरसारख्या क वर्ग महापालिकेचा आयुक्त होण्याचं भाग्य लाभलं. पण संधीचं सोनं करण्याऐवजी जावळे यानं निव्वळ मातीच केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...