गुन्हेगारीनक्की काय घडलं, माहित नाही ... मात्र 'त्यानं' लग्नाच्या दिवशीच विहिरीत उडी...

नक्की काय घडलं, माहित नाही … मात्र ‘त्यानं’ लग्नाच्या दिवशीच विहिरीत उडी घेत केली आत्महत्या आणि ‘होत्याचं नव्हतं’ झालं…!

spot_img

लग्न…! हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय असा क्षण आहे. कारण या क्षणाला ‘दोनाचे चार हात’ झाल्यानंतर जीवनातला खरा संघर्ष सुरू होतो. वास्तविक पाहता लग्न सोहळा हा मांगल्याचा आणि आनंदाचा सोहळा असला तरी एका नवरदेवानं चक्क लग्नाच्या दिवशीच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. त्यानं हे टोकाचं पाऊल का घेतलं, हे मात्र अद्यापपर्यंत समजलेलं नाही.

सुरज राजेंद्र रायकर (वय २८) असं आत्महत्या केलेल्या नवरदेवाचं नाव असून पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडे इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे. हे टोकाचं पाऊल उचलल्यापूर्वी सुरजनं अर्थात नवरदेवानं त्याच्या मामाला फोन करून सांगितलं, की मला लग्न करायचं नाही आणि तो घरातून निघून गेला.

घरातल्या मंडळींनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. काही वेळानं घराजवळील काही अंतरावर असलेल्या वाण्याच्या मळ्यातल्या विहिरीजवळ नवरदेवाची दुचाकी पोलिसांना आढळली. पोलिसांना शंका आल्याने घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. काही स्वयंसेवकांच्या मदतीने पोलिसांनी विहिरीत शोध घेतला असता त्या विहिरीत सुरजचा मृतदेह आढळून आला.

हे समजल्यानंतर सुरजच्या नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला. ‌ लग्नाच्या अगदी काही मिनिटापूर्वीच सुरजनं आत्महत्या का केली असावी, असा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...