नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कांद्याची माळ गळ्यात घालून हातात दुधाची बाटली घेत मतदान करणाऱ्या शेतकरी संघटनेचे नेते त्रिंबक भदगले यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे चांगलेच काम कान उपटले आहेत. देशातल्या शेतकऱ्यांना तुमचं अनुदान नको, तुमची भीक नको. मात्र शेतमालाला योग्य हमीभाव द्या, अशा शब्दांत भदगले यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
भदगले म्हणाले, ‘दुधाला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतीचा हा जोडधंदा अडचणीत आला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना अत्यंत कमी भावात दूध विकावं लागत आहे. दुधातली भेसळ थांबविण्यात जर केंद्र आणि राज्य सरकारला यश आलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी नुसती नावालाच उठवली. मात्र केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांविषयी अजिबात काळजी नाही.’