अहिल्यानगरमधल्या (अहमदनगर) विळद घाट ते कोल्हारपर्यंतच्या धोकादायक गॅस पाईपलाईनच्या कामावर कोणाचं लक्ष आहे की नाही, अशी शंका सध्या उपस्थित केली जात आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून प्रचंड अशी मनमानी होत आहे. या कामात होत असलेल्या हलगर्जीपणामुळे भविष्यात मोठी अप्रिय घटना होऊन मोठ्या प्रमाणात जिवितहानी शकते.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अमोल कोठारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज दिला. मात्र त्यांना कुठल्याही स्वरूपाची माहिती देण्यात आली नाही, अशी तक्रार कोठारी यांनी ‘महासत्ता भारत’ न्यूज नेटवर्क बोलताना केली.
प्रचंड ज्वलनशील असलेला असा हा पदार्थ या पाईपलाईनमधून थेट कोल्हार या गावाकडे जाणार आहे. या पाईपलाईनच्या कामात ठिकठिकाणी सिमेंट काँक्रेटचा थर देणं आवश्यक आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कोठारी यांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीकडे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लक्ष द्यावं, तसेच या ठेकेदाराचं बिल अदा करण्यात येऊ नये, अशीदेखील मागणी कोठारे यांनी केली आहे.